Guardian Minister Raut expressed displeasure over the work of the officers 
नागपूर

बैठकीत अधिकाऱ्यांवर बरसले पालकमंत्री नितीन राऊत

नीलेश डोये

नागपूर  : अकरा महिन्यांपूर्वी झालेल्या जिल्हा नियोजन समितीचा अनुपालन अहवाल तयार न केल्याने पालकमंत्री नितीन राऊत यांनी नाराजी व्यक्त करीत अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावल्याची माहिती पुढे आली आहे. यामुळे अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या अनुपालनाचा शंभर टक्के अहवाल पुढील बैठकीत सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले. 

बैठकीला जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, तसेच नागपूर महापालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक राहुल माकणीकर बैठकीस उपस्थित होते. नवीन वर्षासाठीचे प्रस्ताव, जिल्हा वार्षिक योजना, सर्वसाधारण पुनर्विनियोजन, जिल्हा वार्षिक योजनेचे सर्वसाधारण प्रारूप, आराखडा २०२१-२२ संदर्भातील आढावा, घेण्यासाठी पालकमंत्री यांच्या मार्गदर्शनात जिल्हा नियोजन समिती अंतर्गत कार्यकारी समितीची सभा सोमवारी घेण्यात आली. 

या सभेत प्रत्येक विभागाच्या यावर्षीच्या अर्थसंकल्पीय तरतुदींवर चर्चा करण्यात आली. २० जानेवारीला डीपीसीची सभा झाली होती. यात मंत्री, आमदार, सदस्यांनी अनेक सूचना करीत काही प्रकरणात चौकशीची मागणी केली होती. त्यांच्या मुद्यांवर काय झाले, याची विचारणा पालकमंत्री यांनी केली. यावर विभागाकडून कोणत्याही प्रकारचे समाधानकारक उत्तर देण्यात आले नाही. 

नियोजन विभागाकडून याची माहिती घेण्यात आली नाही. यावर पालकमंत्र्यांनी नाराजी व्यक्त अधिकाऱ्यांना धारेवर धरल्याची माहिती आहे. पालकमंत्री राऊत यांनी वर्ष २०२१-२२ करता प्रारूप आराखडा तयार करताना नावीन्यपूर्ण योजनांवर भर देण्याच्या सूचना केल्या. जिल्ह्याची लोकसंख्या आणि इतर घटक लक्षात घेता आराखडा तयार करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

खर्च न होणारा निधी वेळेत समर्पित करा

कोरोनामुळे शासनाकडून डीपीसीला ३३ टक्केच म्हणजे १३३ कोटींचाच निधी देण्यात आला होता. या महिन्यात कात्री लावण्यात आलेला संपूर्ण निधी दिला. त्यामुळे जिल्ह्याला ४०० कोटींचा निधी मिळाला असून चार महिन्याचा खर्च करायचे आहे. या कालावधीत निधी खर्च होत नसेल तर मार्च पूर्वीचा निधी समर्पित करण्याचे निर्देश पालकमंत्री राऊत यांनी दिले. 

संपादन : अतुल मांगे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI ची मोठी घोषणा! WPL 2027 च्या तारखा जाहीर; २८ ऑक्टोबरला ऑक्शन, फ्रँचायझीला या महिन्याची दिलीय डेडलाईन, नेमकं काय?

Road Development : धनंजय मुंडेंच्या मागणीला यश! लोखंडी सावरगाव-बर्दापूर फाटा रस्ता होणार चौपदरी; १०४.४९ कोटींच्या कामाची निविदा प्रसिद्ध

Saudi Arabia Drone Attack : मुस्लिमांसाठी पवित्र मक्कावर ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न ; सौदीने हवेतच केले नष्ट, भारताने व्यक्त केली चिंता

Gangapur News : शिक्षकांची बंद केलेली वेतनवाढ आदेश त्वरित रद्द करावा; आमदार सतीश चव्हाण यांची मागणी

Nagpur News : सहकाराचा गाडा रुळावरून घसरला! दहा वर्षांत आठ सहकारी पतसंस्था डबघाईस, २२ संस्था अवसायनात; मौद्यात सहकार संकटात

SCROLL FOR NEXT