Harassment from finance companies ?, Demand to file fir 
नागपूर

फायनान्स कंपन्यांकडून छळ, ऑटोचालकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली ही मागणी...

योगेश बरवड

नागपूर : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर फायनान्स कंपन्यांचे हफ्ते सप्टेंबर महिन्यापर्यंत थांबविण्याची मुभा केंद्र सरकारने दिली आहे. यानंतरही काही फायनान्स कंपन्या ऑटोचालकांना वारंवार हफ्ते भरण्यासाठी त्रास्त करीत आहेत. याप्रकारासंदर्भातील तक्रार ऑटोचालकांच्या शिष्टमंडळाकडून आज जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांच्याकडे निवेदनातून केली आहे. सततच्या तगाद्यामुळे व्यथित होऊन ऑटोचालकाने अप्रिय पाऊल उचलल्यास संबंधित कंपनीविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याचीही मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. 

कोरोनाच्या संकटकाळात अनेकांचे उत्पन्नाचे स्रोतच थांबले आहेत. रोजगारावर झालेला परिणाम लक्षात घेऊन फायनान्स कंपन्या व बॅंकांचे हफ्ते सप्टेंबर महिन्यानंतर भरण्याची सूट देण्यात आली आहे. यानंतरही फायनान्स कंपन्यांकडून हफ्ते भरण्यासाठी तगादा लावला जात आहे. रस्त्यावर ऑटो दिसत असले तरी सवारी मिळत नाही. परिणामी ऑटोचालकांना संसाराचा गाडा हाकणे कठीन होऊन बसले आहे. यामुळे काही ऑटोचालकांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले आहे.

पूर्ण जाणीव असूनही फायनान्स कंपन्यांकडून ऑटोचालकांना वारंवार फोन कॉल्स करून त्रास दिला जात आहे. आधीच दुविधेत असणाऱ्या ऑटोचालकांच्या मानसिकतेवर त्यामुळे विपरित परिणाम होत आहे. कंपन्यांच्या तगाद्याला कंटाळून ऑटोचालकांनी टोकाचे पाऊल उचलल्यास संबंधित कंपनीविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

विदर्भ ऑटोरीक्षा चालक फेडरेशनचे अध्यक्ष विलास भालेकर यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळात उपाध्यक्ष राजू इंगळे, सचिव प्रिंस इंगोले, टायगर ऑटोरीक्षा संघटनेचे अध्यक्ष जावेद शेख, उपाध्यक्ष रवी सुखदेवे, महासचिव प्रकाश साखरे, किशोर इलमकर आदींचा समावेश होता. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: साखर झोपेत असताना भयंकर घडलं! ठाण्यात २५ वर्षे जुन्या सदनिकेचा काही भाग कोसळून दुर्घटना; २ जखमी

Pune Crop Insurance: पुणे जिल्ह्यात सुमारे ८३,००० शेतकऱ्यांनी काढला पीक विमा; २३८ कोटी रुपयांचे मिळणार पीक विमा सुरक्षा कवच

‘मला वाटलं मी मरणारच…’ कॅन्सरच्या निदानानंतरची ती भयानक रात्र सांगताना मनीषा कोईराला भावुक, म्हणाल्या...

Marathi News Live Updates : चाकणमध्ये ५ ते ७ किमी वाहनांच्या लांबच लांब रांगा! खड्ड्यांमुळे महामार्गावर अपघात; २ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू, दोघे गंभीर

पुण्यातील बुधवार पेठेत सपना बिल्डिंगमध्ये पोलिसांचा छापा... समोर जे दिसलं ते धक्कादायक, २ जणांना अटक

SCROLL FOR NEXT