rupee- 
नागपूर

तिला त्याने दाखवले नोकरीचे आमिष आणि...

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड (वेकोलि)मध्ये झालेल्या स्टाफ नर्सच्या परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या परिचारिकेला ठगसेनांनी अंतिम यादीत नाव आणण्यासाठी 2 लाख रुपयांची मागणी केली. पहिला हप्ता म्हणून 30 हजार रुपये घेऊन परिचारिकेची फसवणूक करण्यात आल्याची घटना एमआयडीसीत उघडकीस आली. दीपलता जांगळे (26, रा. पोलिसनगर, एमआयडीसी) असे फसवणूक झालेल्या तरुणीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वेकोलिची 18 डिसेंबर 2019 ते 1 जानेवारी 2020 दरम्यान स्टाफ नर्स पदासाठी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत दीपलता चांगल्या गुणांनी परीक्षा पास झाली होती. वेकोलिकडून जारी करण्यात आलेल्या निकालात तिचे नाव होते. ही बाब अज्ञात आरोपी ठगबाजांनी हेरली. तिला मोबाईलवरून ठगबाजांनी फोन केला. आपण रविकुमार बोलत असल्याचे सांगितले. तुमचे नाव अंतिम यादीत येण्यासाठी 2 लाख रुपये द्यावे लागतील. त्यानंतर तुमची निवड होईल. भविष्याचा प्रश्‍न असल्याने दीपलता हिने 30 हजार रुपये देण्याचे कबूल केले.

ठगबाजांचे मोठे रॅकेट 

ठगबाजाने नागराज कुमार याचे नाव सांगितले. या नावाचा एसबीआयचा खाते क्रमांक दीपलता हिला देण्यात आला. या खात्यात 30 हजार रुपये भरण्यास सांगितले. दीपलताने सांगितलेल्या खात्यावर 30 हजार रुपये जमा केले. मात्र, पैसे भरूनही बरेच दिवस झाल्याने ठगबाजांकडून निवड झाल्याचा फोन आला नाही. त्यामुळे दीपलताने वेस्टर्न कोल्ड फिल्ड लिमिटेड कार्यालयात जाऊन चौकशी केली असता या नावाने कोणतेच कर्मचारी नसल्याचे सांगण्यात आले. आपली फसगत झाल्याचे लक्षात येताच तिने थेट पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून ठगबाजांचा शोध सुरू केला. यामागे ठगबाजांचे मोठे रॅकेट असण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Operation Tiger: उद्धव ठाकरेंचे 'हे' सहा खासदार दिल्लीत दाखल?, शिंदे दिल्लीकडे रवाना, उद्या लोकसभा अध्यक्षांची होणार भेट?

Pune News : नाट्यगृहाच्या आरक्षणासाठी ॲप अनिवार्य करणार; स्थायी समितीचा निर्णय

Vantara Confirms Madhuri Elephant Return Kolhapur : 'कोल्हापूरकर आम्ही माधुरी हत्तीला पाठवतोय'; वनताराने अखेर दिली कबुली; व्हिडिओ केला सादर

Uruli Kanchan Blood Donation : उरुळी कांचनमध्ये ड्रीम्स युवा फाउंडेशनचे विक्रमी ८०६ पिशव्या रक्तदान

Privatization of Schools : बहुमताच्या जोरावर शाळांच्या खासगीकरणाचा प्रस्ताव मंजूर

SCROLL FOR NEXT