file photo 
नागपूर

दुचाकीवर होता बसून... विद्यार्थी जवळ येताच घेतला चावा 

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्याला शनिवारी मध्यरात्रीनंतर आपत्कालीन स्थितीत सेवेसाठी निघाला असताना वसतिगृह परिसरात साप चावल्याची घटना घडली. यानंतर तो मेडिकलच्या आपत्कालीन विभागात पोहोचला. त्याच्यावर मेडिकलच्या अतिदक्षता विभागात उपचार झाले. रविवारी दुपारी या विद्यार्थ्याची प्रकृती ठीक झाली. यामुळे त्याला सुटी देण्यात आली. 

शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांच्या वसतिगृहासमोर गवत वाढले आहे. यामुळे येथून ये-जा करताना सरपटणाऱ्या प्राण्यांची भीती असते. मुखशल्यक्रियाशास्त्र विभागातील पदव्युत्तरच्या प्रथम वर्षात हा विद्यार्थी शिकतो. येथील वसतिगृहातच निवासाला आहे. रविवारी रात्री एक अपघाताचा रुग्ण मेडिकलच्या आपत्कालीन विभागात आला. दंत विभागाला कॉल आला. यामुळे हा विद्यार्थी दुचाकीजवळ आला. दुचाकी सुरू करताना तेथे साप असल्याचे त्याला दिसले नाही. साप गाडीच्या समोरच्या भागाला होता. सापाने त्याच्या डाव्या हाताच्या बोटाचा चावा घेतला. सर्पमित्राने शोध घेतला असता साप विद्यार्थ्यांच्या दुचाकीतच लपून बसल्याचे पुढे आले. 
 
अधिक वाचा : पोटात भूक घेऊन त्यांचा 800 कि.मी.चा पायी प्रवास 
 

साप बिनविषारी 
सापाला पकडल्यावर तो साप बिनविषारी असल्याचे पुढे आले. याबाबत मेडिकलच्या डॉक्‍टरांना कळवण्यात आले. या विद्यार्थ्याला मधुमेह आहे. यामुळे प्रकृती खालावण्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. रात्रभर तज्ज्ञ डॉक्‍टरांकडून औषधोपचार करण्यात आले. दुपारी उशिरापर्यंत तो या धक्‍क्‍यातून बाहेर आला. प्रभारी अधिष्ठाता डॉ. मंगेश फडनाईक यांच्याशी संपर्क साधला असता, विद्यार्थ्याची प्रकृती ठीक असून त्याला सुटी झाली. आठवड्यापूर्वी या परिसराची पाहणी केली असल्याचे ते म्हणाले. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

OBC Reservation: राज्य सरकारला मोठा झटका! ६७% ओबीसी आरक्षणावरील स्थगिती उठवण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

Prakash Londeh :'भूयार' सापडलेल्या परिसरात महापालिकेची कारवाई; लोंढे कुटुंबाच्या अडचणीत वाढ

फ्रेश लुक असलेला "लास्ट स्टॉप खांदा चित्रपटाचा टीजर लाँच; 'या' दिवशी येणार भेटीला

Ranji Trophy 2025 : अर्जुन तेंडुलकरच्या संघातून दोघांची द्विशतकं, गोवा संघाच्या ८ बाद ५५० धावा! सचिनच्या लेकाच्या यात किती धावा?

Diwali Makeup Tips: दिवाळीत मेकअप करताना या' चूका टाळा, अन्यथा त्वचा होईल खराब

SCROLL FOR NEXT