health news women die while giving birth 1176 mothers died in Nagpur in 7 years sakal
नागपूर

आई होतानाच दगावतात शेकडो महिला

नागपूर जिल्ह्यात ७ वर्षांत १ हजार १७६ मातांचा मृत्यू ; आधुनिक युगाला लाजवणारा प्रकार

केवल जीवनतारे @kewalsakal

नागपूर : नऊ महिने आपल्या उदरात वाढवल्यावर मध्यरात्री नरखेड ग्रामीण रुग्णालयात मातेने बाळाला जन्म दिला. प्रसूतीही सामान्य झाली. पण रक्तस्राव थांबत नसल्याने तिला नागपुरात रेफर केले. मात्र रस्त्यात तिचा मृत्यू झाला अन् चिमुकले बाळ आईविना पोरके झाले. मातृत्वाचा आनंद उपभोगण्याआधीच शालिनी ढोके या मातेने जगाचा निरोप घेतला. अशा एक, दोन नाही तर २०१४ ते २०२१ या ७ वर्षांत नागपूर जिल्ह्यात तब्बल १ हजार १७६ माता प्रसूतीदरम्यान दगावल्या. तर २०२१-२२ दरम्यान जिल्ह्यात अशा १७० मातांचा मृत्यू झाला.

हे यूग माहिती तंत्रज्ञानाचे युग आहे. दररोज वैद्यकशास्त्रात नवे शोध लागताहेत. परंतु मातामृत्यूचा दर घटविण्यात सार्वजनिक आरोग्य विभागासह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांनाही अपयश आले आहे. मध्य भारताचे मेडिकल हब बनलेल्या नागपूर शहरात माता मृत्यूची आकडेवारी फुगली आहे. तर ग्रामीण भागाबाबत काय बोलावे? विशेष असे की, स्वातंत्र्याच्या सत्तरीत ज्या वस्तीत डॉक्टर पोहचला नाही, त्या ‘टोली’त वर्षभरात ५२ बाळांचा घरातच जन्म झाला. त्या बाळांची नाळ कापण्याचे काम ‘दाई’ ने केले. या टोलीत ना माता दगावली, ना बाळ. हीच स्थिती नागपुरातील गोंड वस्तीत आहे.

येथेही प्रसूती घरीच होते, या वस्तीत ना आशा पोचली ना डॉक्टर. घरीच बाळ जन्माला आल्यानंतरही माता आणि बाळ सुरक्षित असते. यावरून ‘दाई’ गर्भवतींना डॉक्टरपेक्षा निश्चितच जवळची वाटू शकते. याउलट सर्व सेवांनी सुसज्ज अशा रुग्णालयात मात्र मातांचा मृत्यू रोखण्यात डॉक्टरांना अपयश का येत आहे. हा खरा प्रश्‍न आहे. आदिवासी तसेच ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी व निमशहरी भागात प्रसूती दरम्यान मातामृत्युचे प्रमाण प्राप्त आकडेवारीवरून पुढे आले आहे. २०१४ ते २०११ या कालावधीत नागपूर जिल्ह्यात १२.७७ टक्के अर्थात १ हजार १७६ माता दगावल्यात. तर एप्रिल २०२१ ते मार्च २०२२ या कालावधीत नागपूर जिल्ह्यात १७० माता दगावल्या. यात शहरातील ५३ ग्रामीण भागातील ३८ तर इतर जिल्ह्यातील ५३ आणि राज्याच्या इतर भागातील २६ मृत्यूंचा समावेश असल्याची माहिती नागपूर महापालिकेकडून प्राप्त झाली आहे.

कंत्राटीच्या हाती किल्ल्या; हरवले गांभीर्य

पूर्वी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत निश्‍चित केलेल्या उद्दिष्टांमध्ये ‘मातामृत्यू कमी करणे'' हे उद्दिष्ट सर्वात प्रमुख होते, त्याचे आता राष्ट्रीय आरोग्य अभियान असे सुंदर नामकरण करण्यात आले आहे. पुणे येथील राज्य कुटुंब कल्याण कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार जानेवारी २०१४ ते जानेवारी २०२१ या ७ वर्षांत राज्यातील मातामृत्यूची माहिती अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे यांनी समर्थन संस्थेला दिली आहे. आकडेवारीनुसार ७ वर्षात राज्यात ९ हजार २०८ मातांनी प्राण गमावले. राष्ट्रीय आरोग्य अभियानात कंत्राटी डॉक्टरांच्या हातात सर्व किल्ल्या असल्यामुळे या व्यवसायातील गंभीरपणा हरवला आहे. मातामृत्यू रोखण्यासाठी सरकारने जननी शिशू सुरक्षा योजनेचा नारा दिला. परंतु हा नाराही मातामृत्यू दर कमी करण्यात यशस्वी ठरला नाही. महाराष्ट्रात आताही एक लाख मातांमध्ये शंभऱापेक्षा अधिक आहे.

मातामृत्यूची कारणे

  • ३० टक्के - रक्तस्राव होणे

  • १९ टक्के - अशक्तपणा वा कुपोषण

  • १६ टक्के - जखम किंवा पू होणे

  • १० टक्के - गुंतागुंत होणे

  • ९ टक्के - गर्भपात

  • ८ टक्के - रक्तात विष पसरणे

  • ८ टक्के - इतर करणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange : मराठा आरक्षणाचा लढा आता मुंबईत, कसं असेल मनोज जरांगेंच्या आंदोलनाचं स्वरुप? वाचा...

Pune News : 'तो' तरुण सिंहगडावरुन बेपत्ता झालाच नाही, प्रकरणाला वेगळं वळणं ; नेमकं काय घडलं?

Sanju Samsonचे ट्वेंटी-२०त वेगवान शतक; आता Asia Cup मध्ये त्याला सलामीला खेळवायचं की नाही, हे निवड समितीनं ठरवायचं...

Latest Marathi News Updates : फडणवीस वाकड्यात घुसतात, म्हणून मी असं बोलतो – मनोज जरांगे

Adani Group: एका वर्षात अदानी समूहाचे कर्ज 20 टक्के वाढले; सरकारी बँकांनी किती कोटी दिले?

SCROLL FOR NEXT