heart attack worker was evacuated from a hospital in Nagpur 
नागपूर

पैसा झाला मोठा! हृदयविकाराचा झटका आलेल्या कामगाराला सुनावले हे...

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : टॉकीजमध्ये काम करणाऱ्या कामगाराला अचानक हृदयविकाराचा झटका आला. त्याला राज्य कामगार विमा योजनेअंतर्गत (ईएसआयसी) संलग्न असलेल्या रुग्णालयात उपचारासाठी नेले. परंतु, ईएसआयसीने त्या रुग्णालयाची थकबाकी अदा केली नसल्याने रुग्णाला या योजनेअंतर्गत उपचार नाकारण्यात आला. "पैसे भरा आणि उपचार करा', असे बोल रुग्णाला सुनावण्यात आले. मृत्यूच्या दारात असलेल्या त्या कामगार रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी पैशाची जुळवाजुळव करण्यात आली. सध्या त्याच्यावर जगनाडे चौकातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

विदर्भातील दोन ते अडीच हजार कंपन्यांमध्ये सुमारे दीड लाख कामगार व त्यांच्या कुटुंबीयांवरील उपचारासाठी राज्य कामगार विमा योजना रुग्णालय सुरू आहे. या योजनेअंतर्गत कामगारांना नागपूरसह विदर्भातील डिस्पेंसरी आणि राज्य विमा रुग्णालयात मोफत उपचाराची सोय आहे. कामगारांना मोफत उपचार मिळावे यासाठी प्रत्येक कामगारांच्या मासिक वेतनातून वेतनाच्या 1.75 टक्के निधी कापला जातो. तसेच कंपनी मालकांकडून 4.75 असा निधी कपात केला जातो. दरमहिन्याला ही रक्कम ईएसआयसीकडे जमा होते. मात्र, त्यानंतरही कामगार रुग्णांना संलग्नित रुग्णालयात उपचार मिळत नाही. 

या कामगाराला मिळावी वैद्यकीय प्रतिपूर्ती

राज्य कामगार रुग्णालयात उपचाराच्या अत्याधुनिक सुविधा नसल्याने शहरातील काही संलग्न खासगी रुग्णालयात रेफर केले जाते. परंतु, या रुग्णालयातही या रुग्णांना मोफत उपचार मिळत नाही. रेफर करताना पदरचे खर्च करून कामगार उपचार घेतात. परंतु, पुढे वैद्यकीय प्रतिपूर्ती बिले सादर केल्यानंतर मात्र वर्षानुवर्षे थकवली जातात. त्यामुळे वैद्यकीय प्रतिपूर्ती बिलांची कोटी-कोटीची रक्कम थकीत आहे. विमा काढूनही कर्जबाजारी होण्याची वेळ कामगारांवर ईएसआयसीने आणली आहे. या कामगार रुग्णालयाकडून वैद्यकीय प्रतिपूर्ती मिळावी, अशी मागणी कामगार संघटनांनी केली आहे.

हाती देण्यात येते औषधांची चिठ्ठी 
स्वतःच्या आरोग्याचा खर्च कामगार स्वतः करतो. परंतु, त्याच्या वेतनातून पैसे कापले जातात. यामुळे विमा रुग्णालयात किंवा संलग्न रुग्णालयात अत्याधुनिक उपचार मिळावे हा कामगार रुग्णाचा अधिकार आहे. औषध खरेदी करण्याचे काम रुग्णालय प्रशासनाचे आहे. त्यांनी खरेदी करून कामगारांना द्यावे. परंतु, कामगारांच्या हाती औषधांची चिठ्ठी देण्यात येते. टॉकीजमध्ये काम करणाऱ्या या कामगाराला वैद्यकीय प्रतिपूर्ती मिळावी. 
- मुकुंद मुळे, 
कामगार नेता, इंटक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

८० लाख पॅकेजची नोकरी AIमुळे गेली, IT इंजिनिअर पतीने आयुष्य संपवलं; शेवटची चिठ्ठी वाचून पत्नीनेही १८व्या मजल्यावरून मारली उडी

Kurla Accident: कुर्ला बस दुर्घटनेप्रकरणी मोठी अपडेट, आरोपी बेस्ट बसचालकला अखेर जामीन; हायकोर्टाचा निर्णय

Team India Schedule: भारतीय संघ व्यस्तच राहणार...! इंग्लंड दौऱ्यानंतर या देशात टी२० मालिका खेळणार; BCCI कडून घोषणा

IPL 2026 Marathi News: वैभव सूर्यवंशीला ९ कोटींचा फटका... राजस्थान रॉयल्सच्या 'Deal' शी आहे कनेक्शन; जाणून घ्या सर्व प्रकरण

"दारूमुळे माझं पहिलं लग्न मोडलं" जावेद अख्तरांची कबुली ; "मी एका वेळेला 18 बियर.."

SCROLL FOR NEXT