Nagpur Rain Video Sakal
नागपूर

Nagpur Rain Video : रेल्वे स्टेशनवर पूर! फलाट, रूळावरून वाहू लागल्या नद्या

पावसाची रिपरिप सुरू असून अनेक भागांतील विजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : नागपुरात मुसळधार पावसाने कहर घातला असून शहरातील रस्त्यावर पाणी साचले आहे. नाल्यांना आणि सखोल भागातील रस्त्यांना नद्याचे स्वरूप आले असून यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अजूनही नागपुरात पावसाची रिपरिप सुरू असून अनेक भागांतील विजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

रेड अलर्ट

नागपूर महानगर पालिकेने मुसळधार पावसामुळे सतर्कतेचा इशारा दिला आहे. महत्त्वाच्या कामाशिवाय कुणीही घराच्या बाहेर न निघण्याचे आदेश जारी करण्यात आले असून आपत्कालीन सेवेसाठी नंबर देण्यात आला आहे. संकटकाळात 07122567029 किंवा 07122567777 या क्रमांकावर फोन करण्याचे आवाहनही महानगर पालिकेकडून करण्यात आले आहे.

रेल्वे स्थानकांवर पाणीच पाणी

पावसाचा जोर एवढा होता की रेल्वेच्या रूळावर जवळपास तीन ते चार फुट पाणी साचले असून रेल्वे फलाटाला सुद्धा नदीचे स्वरूप आले आहे. रेल्वे रूळ आणि फलाटावरील पाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तर यामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली असून काही गाड्या रद्द करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. तसेच अग्निशामक, NDRF आणि SDRF चे पथके नागपुरात बचावकार्यासाठी दाखल झाले आहेत.

शाळांना सुटी जाहीर

मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. नागपूर जिल्हा व महानगर भागातील सर्व शाळांना सुट्टी देण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

Sachin Ahir: उपसभापतिपदाची प्रतिष्ठा वाढवेन: सचिन अहिर यांची ग्वाही; कष्टकरी, कामगार, महाराष्ट्राशी बांधिलकी सोडणार नाही!

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

सौरऊर्जा मीटर जोडणीच्या ऑर्डरसाठी घेतली ४ हजार रुपयांची लाच; सहायक अभियंत्याला रंगेहात पकडलं...

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

SCROLL FOR NEXT