rain 
नागपूर

नागपुरात बारा तासांत 100 मिलिमीटर पाऊस। उडाली दाणादाण

नरेंद्र चोरे

नागपूर : गेल्या दीड महिन्यापासून नागपूरकर ज्या धुवॉंधार पावसाची प्रतीक्षा करीत होते, तो अखेर काल रात्री बरसला. रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसाने शहराची अक्षरशः दाणादाण उडविली. अवघ्या बारा तासांत तब्बल 100 मिलिमीटर पावसाची नोंद हवामान विभागातर्फे करण्यात आली. विदर्भावरील पावसाचे संकट अद्याप टाळले नाही. आज-उद्याही विदर्भात मुसळधार पावसाची दाट शक्‍यता आहे.

हवामान विभागाने मंगळवारपासून मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. हवामान विभागाचा अंदाज तंतोतंत खरा ठरला. दुपारच्या सुमारास जोरदार सरी कोसळल्यानंतर वरुणराजाने रात्री अचानक गिअर बदलविला. रात्री दहानंतर शहरात सगळीकडेच विजांच्या कडकडाटांसह धोधो पाऊस बरसला. पहाटेपर्यंत पाऊस सुरूच होता. मंगळवारी रात्री साडेआठ ते बुधवारी सकाळी साडेआठपर्यंत तब्बल 100.8 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली.

सविस्तर वाचा - आई होण्याचा मंतरलेला नऊ महिन्यांचा काळ

उल्लेखनीय म्हणजे, यंदाच्या पावसाळ्यात 12 तासांत एवढा पाऊस पहिल्यांदाच बरसला आहे. 15 दिवसांचा पाऊस एकाच रात्री कोसळला. पावसामुळे अनेक भागांत कुठे गुडघाभर तर कुठे कंबरेपर्यंत पाणी साचले होते. काही ठिकाणी विद्युत पुरवठाही खंडित झाला होता. त्यामुळे नागरिकांना अंधारात रात्र काढावी लागली. शिवाय अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांचीही चांगलीच दमछाक झाली. हवामान विभागाने आज-उद्याही विदर्भात मुसळधार पावसाची शक्‍यता वर्तविली आहे. काही जिल्ह्यांत अतिवृष्टीचीही शक्‍यता आहे.  


संपादन - स्वाती हुद्दार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG, 2nd T20I: रवी बिश्नोईची 'ती' चूक महागात पडली! जेकब बेथलच्या आक्रमणामुळे भारताविरुद्ध इंग्लंडचा ऐतिहासिक विजय

IND vs ENG, 2nd T20I: अक्षर पटेलने इंग्लंडच्या कॅप्टनला आऊट करत घडवला इतिहास; यापूर्वी कोणत्याही भारतीय फिरकीपटूला जमलं नव्हतं!

जळगावमध्ये भीषण अपघात! टोलनाक्यावर उभ्या ट्रकला गॅस टँकरची धडक, बघता क्षणी घेतला पेट, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू

Latest Marathi Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Raigad Heavy Rain : रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा; अंबा नदी धोक्यापलीकडे, भेरव पूल पाण्याखाली, पोलादपुरात दरड कोसळल्याने नागरिकांचे स्थलांतर

SCROLL FOR NEXT