Nagpur Rain Update Esakal
नागपूर

Nagpur Rain Update: नागपुरात ढगफुटी! सतर्कता बाळगत जिल्हा व महानगरातील शाळांना सुट्टी जाहीर

नागपूर जिल्हा व महानगरातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

नागपुरात मुसळधार पावसामुळे मोठ्या जनजीवन विस्कळीत झाले आहे. नागपुरात रात्री विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला असून एका रात्रीत 106 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सततच्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक सखोल भागात पाणी शिरले असून नागलवाडी, अंबाझरी कार्पोरेशन कॉलोनीमधील अनेक घरात पाणी शिरले आहे. हवामान खात्याने नागपुरात पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला होता. तसेच येथे अजूनही अद्यापही पावसाची रिपरिप सुरूच आहे. अनेक भागातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे.

नागपूर जिल्हा व महानगरातील शाळांना सुट्टी जाहीर

नागपूर शहरांमध्ये रात्री दोन वाजता पासून सुरू झालेल्या सततधार पावसामुळे शहराच्या सखल भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. अंबाझरी तलाव ओव्हर फ्लो झाला असून जिल्हा व महानगर प्रशासनाची आपत्ती व्यवस्थापन चमू कार्यरत आहे. आज सकाळीच जिल्हाधिकारी व महानगर पालिका आयुक्तांनी शहरातील अनेक भागांची पाहणी केली. शहरासह जिल्ह्यातील परिस्थितीवर आपत्ती व्यवस्थापन विभाग लक्ष ठेवून आहे.

जिल्ह्यातील सर्व शाळांना ( जिल्हा व महानगर क्षेत्र ) जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आज सुट्टी जाहीर केली आहे.

नागपूर महानगरपालिकेकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा

नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागपूर शहरात रात्रीपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे आवश्यक कामाशिवाय कुणीही घराबाहेर पडू नये. सततच्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी तसेच रस्त्यांवर पाणी जमा झाले आहे. नदी नाल्यांमध्ये पाणी वाढत असल्यामुळे पूल ओलांडू नये. पाणी कमी झाल्यानंतरच पूल ओलांडावा.

अंबाझरी तलावाचे पाणी ओव्हरफ्लो झालेले आहे. त्यामुळे कुठल्याही अफवांकडे लक्ष देऊ नये. तलाव अथवा ओव्हरफ्लोकडे कुणीही जाण्याचा प्रयत्न करू नये.

नागपूर महागरपालिकेचे अग्निशमन व आपत्कालीन सेवा पथक सातत्याने मदत व बचावकार्य करीत आहेत. कुठल्याही आपत्कालीन सेवेसाठी लगेच मनपाला 07122567029 किंवा 07122567777 या क्रमांकावर संपर्क साधा. अग्निशमन व आपत्कालीन सेवा पथक रात्रीपासून मदत व बचाव कार्यात असून पथकाला सहकार्य करा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT