file photo 
नागपूर

आंतरराष्ट्रीय धावपटू ज्योती चौहानच्या मदतीसाठी सरसावले असंख्य हात 

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : लॉकडाउनमुळे आर्थिक अडचणीत सापडलेली नागपूरची आंतरराष्ट्रीय धावपटू ज्योती चौहान हिला मदतीचा ओघ सुरूच आहे आतापर्यंत अनेक जणांनी तिला वस्तू व रोख स्वरूपात भरीव मदत करून सामाजिक बांधिलकीचा परिचय दिला आहे. 
ज्योतीच्या दयनीय स्थितीबद्दल दैनिक 'सकाळ'ने शनिवारच्या अंकात वृत्त प्रकाशित केल्यानंतर तिच्या मदतीसाठी असंख्य हात पुढे सरसावले.

काल मनपाचे क्रीडाधिकारी पीयूष आंबूलकर यांनी ज्योतीच्या परिवाराला महिनाभर पुरेल इतका किराणा व अन्नधान्य दिल्यानंतर मुंबईचे राजेश पुल्लवार यांनीही तिला आहारासाठी चार हजार रुपये, विद्युत विभागात कार्यरत सुधीर मोहिते यांनी अडीच हजार रुपये, उपजिल्हाधिकारी दिनेश भागवतकर यांनी 2100 रुपये, अतुल खेडेकर यांनी दोन हजार व मधुलिका ग्रुपच्या सदस्यांनी एक हजार रुपयांची मदत केली होती. आजही अनेकांनी ज्योतीला धान्य व पैशाच्या स्वरूपात मदत केली. असोसिएशन ऑफ प्रोग्रेसिव्ह एम्प्लॉइज ग्रुपचे नरेंद्र सूर्यवंशी, डॉ. विलास तेलगोटे व मनोज शेंडे यांनी अन्नधान्याची किट व चार हजार रुपये दिले. याशिवाय असोसिएशनतर्फे तिच्या परिवाराला वर्षभर दर महिन्याला एक हजार रुपयांचीही मदत केली जाणार आहे.

तसेच हिंगणा, एमआयडीसी पोलिस ठाण्याचे ठाणेदार हेमंतकुमार खराबे यांनीसुद्धा ज्योतीच्या घरी अन्नधान्याच्या दोन किट व रोख पाच हजार रुपयांची मदत पाठविली. तसेच कमल कुंदन यांनीही पाच हजार रुपये, नेमबाज अनिल पांडे यांनी चार हजार रुपये आणि जयंत काटदरे यांनी दोन हजार रुपयांची मदत केली. याशिवाय सुनीलकुमार, भावेश कारेकर, राकेश अजाने, सत्या करकेरा, स्वप्नील शिंदे, सचिन सहाने, मानसी वानगीकर, प्रशांत देवरे, संतोष दळवी, हितेश मिरलेकर, श्रीकांत बिजुर, श्री घार्गे यांनीही माझ्या बॅंक खात्यात पैसे टाकल्याचे ज्योतीने सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heavy Rain Hailstorms: पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात गारपीट! वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; 'या' भागांना अलर्ट

Mutha Canal Overflow : मांजरी परिसरात मुठा कालवा ओव्हर फ्लो झाल्याने रस्त्यावर व झोपड्यांमध्ये शिरले पाणी, वाहतूक कोंडीत अडकले प्रवासी

शेतकऱ्यांना उजनीचे सलग ८० दिवस पाणी! धरणाचे ९ दरवाजे उघडले; उन्हाळी आवर्तनासाठी लागणार १७ टीएमसी, धरण ५७ टक्के भरलेले, वाचा...

Bidkin News : बिडकीन हादरले! विहिरीत बुडून २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू; मित्रांसमोरच घडली दुर्दैवी घटना

Pune Crime : गुंतवणूकदारांची फसवणूक; भाजपचा नेता शेखर चरेगावकरला अटक

SCROLL FOR NEXT