high court documentation digitize 41 cr spent to convert 29 cr document e-court nagpur sakal
नागपूर

Nagpur News : उच्च न्यायालयाचे कामकाज पेपरलेसकडे; २९ कोटी पानांचे डिजिटलीकरण; ४१.७० कोटी रुपयांचा खर्च

मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठांचे कामकाज पेपरलेस होण्याकडे वाटचाल सुरू

केतन पळसकर : सकाळ वृत्तसेवा

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठांचे कामकाज पेपरलेस होण्याकडे वाटचाल सुरू आहे. उच्च न्यायालयाच्या खंडपीठात दाखल होणारी प्रकरणे, कामकाजांच्या दस्तऐवजांचे डिजिटलीकरण केले जात आहे. यात तब्बल २९ कोटी पानांचा समावेश असून, त्यासाठी शासनातर्फे ४१.७० कोटी रुपये खर्च करण्यात येईल.

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांची नियुक्ती होताच त्यांनी अधिकाधिक डिजिटल कामकाजावर भर दिला आहे. त्यामुळे ई-कोर्ट प्रकल्पालासुद्धा गती आली आहे. ई कोर्ट प्रणाली मुंबई येथून कार्यान्वित होत असून,

मुंबई उच्च न्यायालयाजवळील केंद्रीय तारघराच्या (सीटीओ) इमारतीत राज्य शासनाने जागा भाड्याने घेत स्वतंत्र्य कक्ष स्थापन केला. न्यायदानाचे कामकाज सुलभ होण्यासोबतच पक्षकार, वकिलांना न्यायालयीन कामकाजाची इत्थंभूत माहिती ऑनलाइन स्वरूपात

उच्च न्यायालयाचे कामकाज पेपरलेसकडे

बघता यावी म्हणून हा प्रकल्प हाती घेण्यात आला. याचाच पुढचा टप्पा म्हणून ४१ कोटी ७० लाख ४८ हजार रुपये खर्चून नागपूरसह औरंगाबाद खंडपीठातील २९ कोटी पानांचे स्कॅनिंग व डिजिटलीकरण करण्यात येत आहे.

डेटा सॉफ्ट कॉम्प्युटर सर्व्हिस प्रा.लि. कंपनीला हे काम देण्यात आले. यापूर्वी उच्च न्यायालयात ऑनलाईन सुनावणीच्या दृष्टीने उपयुक्त साहित्य शासनातर्फे पुरविण्यात आले असून, न्यायहिताच्या दृष्टीने त्याचा वापर सुरू आहे. राज्याच्या इतर कारागृहात असलेले आरोपी आणि गंभीर, सुरक्षेच्या दृष्टीने हजर करू न शकणाऱ्या आरोपींना या प्रणालीमार्फत हजर करण्यात येत आहे.

‘ई-कोर्ट’चे फायदे

  • कागदांचा वापर, डेटा एंट्रीचे प्रमाण घटणार

  • न्यायालय, वकील आणि पक्षकारांच्या वेळेची बचत

  • प्रलंबित खटल्यांची संख्या घटण्यास हातभार

  • आरोपींच्या ऑनलाइन हजेरीमुळे पोलिसांचा ताण कमी

  • नागरिक केंद्रित सेवा तत्पर आणि वेळेत होणार उपलब्ध

निवृत्त कर्मचाऱ्यांची नेमणूक

स्कॅनिंग व डिजिटलीकरणाच्या प्रकल्पासाठी राज्य शासनाने मुंबई उच्च न्यायालयासह नागपूर आणि औरंगाबाद खंडपीठासाठी ८० निवृत्त अधिकारी, कर्मचाऱ्यांची कंत्राटी पद्धतीने नेमणूक केली. यात मुंबईसाठी ४० कर्मचारी नेमण्यात येत असून, नागपूर आणि औरंगाबाद खंडपीठासाठी प्रत्येकी २०-२० कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. त्यांना देण्यात येणाऱ्या वेतनावर वर्षभरात २.९८ कोटी रुपये (३१ हजार दरमहा) खर्च होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

State Government : मंत्रिमंडळाचा निर्णयांचा धडाका; निवडणूक आचारसंहितेपूर्वी घेतले २१ निर्णय

Maharashtra Governance : कायद्याबाहेरील कलमांवर दिला हद्दपारीचा आदेश; विभागीय आयुक्तांनी उपजिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय केला रद्द!

Sakal Karandak : पुणे विभागातून ‘बीएमसीसी’ महाअंतिम फेरीत सकाळ करंडक; विभागीय अंतिम फेरीचा समारोप

PMC elections : महापालिका निवडणुकीच्या मतदार यादीच्या वेळापत्रकात बदल; ६ ऐवजी १४ नोव्हेंबरला प्रारुप मतदार यादी जाहीर होणार!

ODI Record: भारतीय वंशाच्या क्रिकेटरचा अमेरिकेसाठी पराक्रम; विराटलाही मागे टाकत वनडेमध्ये रचला विश्वविक्रम

SCROLL FOR NEXT