नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) तळमजल्यातील ९० खाटा वापरण्याची प्रशासनाला परवानगी दिली आहे. कोरोनाबाधितांना शासकीय रुग्णालयांमध्ये भरती होण्यासाठी खाटा उपलब्ध नसल्याची गंभीरतेने दखल घेत उच्च न्यायालयाने स्वतःहून जनहित याचिका दाखल करून घेतली आहे.
हेही वाचा - श्वास घेणं कठीण झालं, पण दाखविली मरणाची वाट; चार खासगी रुग्णालयात खेटे घातल्यानंतर मेडिकलमध्ये...
या प्रकरणी वर्षभर वेळोवेळी झालेल्या सुनावणीदरम्यान मेडिकलच्या तळघरातील अस्वच्छतेची बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आली होती. तळमजल्यात पावसाचे पाणी साचत असल्याने या ठिकाणचे वातावरण रुग्णांसाठी योग्य नसल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे न्यायालयाने तळमजल्यातील खाटा वापरण्यास २९ सप्टेंबर २०२० रोजी मनाई केली होती. शहरात कोरोनाबाधितांची आकडा वाढत आहे. परंतु, मेडिकलमध्ये पुरेशा खाटा उपलब्ध नसल्याने रुग्णांना भरती करून घेणे कठीण झाले आहे. विशेष म्हणजे, या बाधितांपैकी ५० ते ६० रुग्णांना तत्काळ भरती करून कृत्रिम श्वसन प्रणाली उपलब्ध करून देणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे रुग्णालयाच्या तळमजल्यातील ९० खाटांना रुग्णांच्या उपचारासाठी वापर करण्याची परवानगी देण्यात यावी, या विनंतीसह सरकारने न्यायालयात अर्ज दाखल केला होता. यावर मंगळवारी रात्री १०.१५ वाजता न्यायमूर्ती सुनील शुक्रे व न्यायमूर्ती अविनाश घरोटे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. न्यायालयाने एकंदरीत सर्व परिस्थिती लक्षात घेता सरकारची विनंती मंजूर करीत ९० खाटांना वापरण्यास परवानगी दिली. या प्रकरणी न्यायालयीन मित्र म्हणून अॅड. श्रीरंग भांडारकर, सरकारतर्फे मुख्य सरकारी वकील केतकी जोशी आणि अॅड. उल्हास औरंगाबादकर यांनी व अॅड. सुधीर पुराणिक यांनी इतर पक्षकारांतर्फे बाजू मांडली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.