Nitin Raut  sakal
नागपूर

Nitin Raut : दलित वस्ती सुधार योजनेचा निधी वळविला ; माजी मंत्री डॉ. नितीन राऊत उच्च न्यायालयात, सरकारला नोटीस

साहित्यरत्न लोक शाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजने अंतर्गत उत्तर नागपूरसाठी राखून ठेवलेला निधी इतर मतदारसंघात वळविल्याचा आरोपकरीत जिल्हा नियोजन समितीच्या कारवाईला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखलकरीत आव्हान देण्यात आले आहे.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : साहित्यरत्न लोक शाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजने अंतर्गत उत्तर नागपूरसाठी राखून ठेवलेला निधी इतर मतदारसंघात वळविल्याचा आरोपकरीत जिल्हा नियोजन समितीच्या कारवाईला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखलकरीत आव्हान देण्यात आले आहे. उत्तर नागपूरचे आमदार, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी ही याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने राज्य शासनासह व इतर प्रतिवादींना ५ सप्टेंबरपर्यंत उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले.

या प्रकरणावर न्यायमूर्ती नितीन सांबरे आणि न्यायमूर्ती अभय मंत्री यांच्यासमक्ष सुनावणी झाली. याचिकेनुसार, नगरविकास विभागाने ४ जुलै २००२ रोजी प्रसिद्ध केलेल्या शासन निर्णयानुसार, साहित्यरत्न लोक शाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना (पूर्वी दलीत वस्ती सुधार योजना म्हणून ओळखल्या जात असे) अंतर्गत निधीचे वाटप करण्यात आले. विधानसभेच्या महापालिका हद्दीतील अनुसूचित जातीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात निधी वाटप करण्यात येत. उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघात ४३.२ टक्के अनुसूचित जातीची लोकसंख्या आहे. त्यामुळे, सर्वाधिक निधी उत्तर नागपूरला देण्यात येणार होता. मात्र, राजकीय सूडबुद्धीला शह देण्यासाठी हा निधी बेकायदेशीरपणे इतर मतदारसंघात वळवला जात आहे.

बेकायदेशीरपणे निधी वळवल्याने उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघात ६० कोटींहून अधिक रुपयांची मोठी थकबाकी निर्माण झाली आहे. त्यामुळे, जिल्हा नियोजन समितीने पारित केलेले निधी वाटपाचे आदेश रद्द करून ४ जुलै २००२ च्या शासन निर्णयानुसार निधी वितरित करावा, अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे. न्यायालयाने राज्य शासनाचे मुख्य सचिव, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव व जिल्हा नियोजन समिती नागपूर यांना नोटीस बजावत ५ सप्टेंबरपर्यंत उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले. डॉ. नितीन राऊत यांच्यातर्फे ॲड. दीपेन जग्यासी आणि राज्य शासनातर्फे ॲड. निवेदीता मेहता यांनी बाजू मांडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अखेर तोडगा निघाला! बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे; महायुती सरकारने मान्य केल्या प्रमुख मागण्या, वेतनवाढ आणि ग्रॅच्युइटीवर निर्णय

T20 WC, IND W vs SA W: भारताचे सेमीफायनलचे गणित मारिझान कापच्या 'वन वुमन शो'मुळे बिघडले! दक्षिण आफ्रिकने मँचेस्टरमध्ये दिली मात

Khadakwasla Rain Update: खडकवासला धरण परिसरात तासाभरात ३० मिमी पाऊस; पाणीसाठ्यात वाढ नाही, रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी

Sangli Crime Twist: वेदांत बंडगर खून प्रकरणाला नवे वळण; कुख्यात गुंड म्हमद्या नदाफ अटकेत, पोलिस कोठडीचे अधिकार राखून कारागृहात रवानगी

Paithan Road Crash : पैठण तालुक्यात भीषण अपघात; भरधाव पिकअपच्या धडकेत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, दोन बालकांची प्रकृती गंभीर

SCROLL FOR NEXT