corona Sakal
नागपूर

साडेतीन महिन्यानंतर जिल्ह्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद

गेल्या २४ तासांमध्ये जिल्ह्यात ४३ नव्या बाधितांची भर पडली

सकाळ वृत्तसेवा

नागपूर - गेल्या दोन दिवसांत कोरोना चाचण्यांची संख्या दोन हजारांवर गेली असून नव्या बाधितांची संख्याही वाढला आहे. गेल्या २४ तासांमध्ये जिल्ह्यात ४३ नव्या बाधितांची भर पडली. बाधितांची जिल्ह्याबाहेर प्रवासाची पार्श्वभूमी नसल्याने प्रशासनाची धाकधुक वाढली आहे. बाधितांमध्ये शहरातील २९ जणांचा समावेश आहे.

कोरोनाची तिसरी लाट ओसरल्यानंतर आज जिल्ह्यात प्रथमच २४ तासांत ४३ बाधित आढळून आले. साडेतीन महिन्यानंतर चाळीसपेक्षा जास्त बाधित आढळून आले. २७ फेब्रुवारीला ५८ बाधित आढळले होते. त्यानंतर बाधितांचा आलेख सातत्याने कमी झाला. मार्च-एप्रिलमध्ये अनेक दिवस एकही बाधित आढळून आला नाही. मे मध्येही एक-दोन बाधित आढळून आले.

मनपा कर्मचऱ्यांचीही चाचणी

रुग्णवाढीमुळे संपर्कातील व्यक्तींची चाचणी करण्यावर महापालिकेने भर दिला आहे. महापालिकेतील कर्मचाऱ्यांनीही चाचणी केली असून आता घरोघरी चाचणी अभियान राबविण्यात येत आहे.

लक्षणांच्या कालावधीत घट

रुग्णांमधील लक्षणे तीन दिवसांत नाहीशी होत आहेत- यापूर्वीच्या लाटेत सात दिवस लक्षणे होती

संक्रमण तुलनेत कमी

पहिल्या तीन लाटांमध्ये बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींना विषाणूचे संक्रमण मोठ्या प्रमाणात होते. परंतु सध्या कोरोनाग्रस्तांच्या संपर्कातील व्यक्तींमध्ये विषाणूचे संक्रमण आढळून येण्याचे प्रमाण कमी आहे.

बाधितांमध्ये प्रवासी कमी

मागील काही दिवसांमध्ये दिल्ली, मुंबईसह इतर ठिकाणी प्रवास करणाऱ्यांमध्ये विषाणूचे संक्रमण आढळत होते. परंतु शुक्रवारी आढळलेल्या एकूण ४३ रुग्णांपैकी निवडक रुग्ण सोडले तर इतर जिल्ह्याबाहेर गेले नव्हते.

सक्रिय रुग्ण शंभरावर

अनेक महिन्यानंतर काल, गुरुवारी एक हजारांवर नागरिकांनी चाचण्या केल्या. त्यापूर्वी चाचण्यांची संख्या हजाराच्या आत होती. आज दोन हजार ३२६ जणांनी चाचणी केली. यातील ४३ जण बाधित आढळून आले. त्यामुळे सक्रिय रुग्णांच्या संख्येतही वाढ झाली. काल, गुरुवारी सक्रीय रुग्णांची संख्या ६४ होती. आज ती १०२ पर्यंत पोहोचली. यापूर्वी ९ मार्चला ११२ सक्रीय रुग्ण होते. त्यानंतर सक्रीय रुग्णांची संख्या दोन अंकी होती. आज तीन महिन्यानंतर सक्रीय रुग्णांची संख्या पुन्हा तीन अंकावर गेली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिन अहिर यांची बिनविरोध निवड, विरोधकांनी अर्ज का मागे घेतला? सभागृहात काय घडलं?

Mumbai Local: प्रवाशांची सुरक्षा कोणाच्या भरोशावर? मुंबई लोकलमध्ये आरपीएफ आणि जीआरपी कर्मचाऱ्यांचा तुटवडा; २,५५९ पदे रिक्त

Raj Thackeray: "ते देहविक्रीलाही तयार असतील तर..."; फुटीर लोकप्रतिनिधींवर राज ठाकरेंची टीका, अमित शाहांवर गंभीर आरोप

Sanjay Raut Statement : संजय राऊत म्हणाले 'आम्हाला आत्मचिंतनाची गरज आहे'; मूळ शिवसैनिकांवरच पक्ष उभा राहतो

Hardik Pandya Trade: हार्दिकसाठी CSKसह एकूण ७ फ्रँचायझींमध्ये चुरस; दोनच संघ ज्यांना Mumbai Indians च्या कर्णधारामध्ये नाही रस

SCROLL FOR NEXT