नागपूर

Hingna Crime: थट्टामस्करीही केली अन् वस्तराही चालविला! निवडणुकीनंतर विरोधी गटाच्‍या कार्यकर्त्यावर वार

निवडणुकीनंतर विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यावर ६५ वर्षीय नाव्ह्याने वस्तऱ्याने हल्ला करून गंभीर जखमी केले.

सकाळ डिजिटल टीम

Hingna Crime : तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या देवळी- पेंढरी गावात आज मंगळवारी उपसरपंचपदाची निवडणूक झाली. निवडणुकीनंतर विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यावर ६५ वर्षीय नाव्ह्याने वस्तऱ्याने हल्ला करून गंभीर जखमी केले. ही घटना सायंकाळी ५.३० वाजता घडली. गंभीर जखमीला तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

ग्रामपंचायती जवळच आरोपी नत्थू गणपत साखरकरचे घर व सलूनचे दुकान आहे. उपसरपंचपदाची निवडणूक पार पडल्यानंतर भास्कर रुशाल जाधव (५२) रा. काजळी(पेंढरी) हे साखरकर यांच्या घरासमोरून जात होते.

काही लोकांसमोर आरोपीने भास्कर यांची थट्टा केल्याने वाद झाला. भांडण विकोपाला गेले. संतापलेल्या आरोपीने त्याच्याजवळ असलेला वस्तरा बाहेर काढून भास्करवर वार केला. कानाजवळ वस्तरा लागल्याने भास्कर जखमी झाले. गावातील काही नागरिकांनी त्याला उपचारासाठी नेले.

हिंगणा पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. जखमीने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे. प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलीस ठाण्यात सुरू होती. घटनेचा पुढील तपास ठाणेदार विशाल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वडिलांच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कारच केले नाहीत; मृतदेह प्रिझर्व्ह करून ठेवला, मुंबईतील खळबळजनक घटना

Malvan Accident : दुचाकीच्या धडकेत भाजप नगरसेविकेसह चौघे जखमी, सरकारी दवाखान्यात एक्स रे मशीन बंद असल्याने संताप

LPG Cylinder Price: उद्यापासून गॅस सिलेंडर महागणार? महाराष्ट्रात आज कितीला मिळतो LPG, पाहा शहरनिहाय दर

Pradip Purnekar case: ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याच्या हत्येचा CCTV फुटेज समोर, ७ गोळ्या झाडल्याचा आवाज

Ayush Thite Organ Donation : सोलापूरच्या आयुषच्या हृदयाने रशियातील तीन वर्षांच्या चिमुकल्याला मिळणार नवजीवन; अवयवदानाने वाचणार चौघांचे प्राण

SCROLL FOR NEXT