नागपूर

Hit and Run: ‘हीट अ‍ॅण्ड रन’कायद्याविरोधात वाहतूक संघटना आक्रमक; काळीपिवळी संघटनेचा तीन दिवस बंद

केंद्र शासनाने हीट अ‍ॅण्ड रन बील लोकसभेत सादर केले आहे. या कायद्याला खासगी वाहतूक संघटनांचा कडाडून विरोध सुरू आहे.

सकाळ डिजिटल टीम

Hit and Run Law Agitation: केंद्र शासनाने हीट अ‍ॅण्ड रन बील लोकसभेत सादर केले आहे. या कायद्याला खासगी वाहतूक संघटनांचा कडाडून विरोध सुरू आहे. बिल रद्द करावे, या मागणीसाठी काळी-पिवळी चालक-मालक संघटनेने तीन जानेवारीपर्यंत बंद पुकारला आहे. माल वाहतूक संघटनेने सोमवारी (ता.एक) बेमुदत बंदचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे. केंद्र शासनाने हीट अ‍ॅण्ड रन बिल सादर केले आहे. यात अपघात झाल्यास वाहन चालकाला शिक्षा तसेच दंड अशी तरतूद आहे.

त्यामुळे वाहन चालकांकडून या कायद्याला विरोध होत आहे. जिल्ह्यातील खासगी वाहनचालक संघटनांनी हे बिल परत घ्यावा, अशी मागणी आहे. यासाठी जिल्हाभरातील खासगी वाहनचालकांनी आंदोलन पुकारले आहे. वाहनचालकांनी कामबंद आंदोलन केल्याने खासगी ट्रॅव्हल्स तसेच काळीपिवळी व इतर वाहने उभी होती.

त्याचा परिणाम प्रवाशांवर झाला. वाहने नसल्याने प्रवाशांना तासन्तास ताटकळत बसावे लागले होते. ट्रॅव्हल्स, मिनी ट्रान्स्पोर्ट वाहनचालक संघटना तसेच काळी पिवळी संघटनेतर्फे सोमवारी (ता.एक) जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. काळी-पिवळी संघटनेने एक ते तीन जानेवारीदरम्यान वाहने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

मिनी ट्रान्स्पोर्ट संघटनेनेही तीन जानेवारीपासून बेमुदत कामबंदचा इशारा दिला आहे. यावेळी मिनी ट्रक माल वाहतूक संघटनेचे ज्ञानेश्‍वर इंगळे, प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष बिपिन चौधरी, सतीश जवके, रमेश केदार, जरार खान, अवधूत तंबाखे, सचिन रोडे यांच्यासह काळीपिवळी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supriya Sule: सुप्रिया सुळे यांच्या वाहनाला अपघात! सीटबेल्ट लावल्याने अनर्थ टळला; सुळेंसह सर्वजण सुरक्षित

Beed Crime: तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठकच्या घराची झाडाझडती; २०१६ पासूनच्या फाईल्स उघडणार?

'चल, अजून एक विकेट टाकली खिशात...'! जोस बटलरला बाद करताच जाडेजाचा भन्नाट सेलिब्रेशन; ‘इन माय पॉकेट’ सेलिब्रेशनची जोरदार चर्चा

RR vs GT Live : शुभमन गिलचे शतक थोड्यात हुकले, पण साई सुदर्शनसह राजस्थानला चांगलेच झोडले! गुजरात टायटन्सचा धावांचा डोंगर

Pune Highway Protest: दोन दिवसांत आरोपींना बेड्या ठोकल्या नाहीत, तर पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला जाईल," - आमदार रोहित पवार

SCROLL FOR NEXT