file 
नागपूर

शौकभी बडी महंगी चीज है, बाबू...

सकाळ वृत्तसेवा

टेकाडी (जि.नागपूर)  : तंबाखू आरोग्यास हानिकारक आहे. तंबाखूने कर्करोगाचाही धोका आहे, अशा दर्शनी भागात मोठ्या अक्षरात सूचना देउनही मात्र अनेकांसाठी "शौक बडी चीज है' याचा प्रत्यय येतो. संचारबंदीच्या काळात तंबाखूला मोठी मागणी आहे. त्याचा गैरफायदा काही दुकानदारांनी चांगलाच घेतला आहे. लॉकडाउनमुळे पानटपऱ्या बंद असल्यानेदेखील तंबाखू आणि सुपारीचे ब्लॅक मार्केटिंग करणाऱ्यांनी चांगलीच माया जमवायला सुरुवात केली आहे.

तंबाखूच्या पुडीला चांगलाच भाव
तंबाखू, खर्रा, सिगारेट आणि दारू ब्लॅकमध्ये उपलब्ध जरी होत असले तरी अनेक शौकिनांना "शौक काफी मेहंगी चीज है' म्हणायची वेळ आलेली आहे. संचारबंदीत ठोक बाजारात तंबाखूचा भाव वाढला असल्याचे कारण सांगून किरकोळमध्ये तंबाखूपुडीची चढ्या दराने विक्री सुरू आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फक्त जीवनावश्‍यक वस्तू व आरोग्यसेवा मिळवण्याचीच मुभा शासनाने दिलेली आहे. किराणा दुकानातील तंबाखूचा साठा संपलेला असल्याने तंबाखू सुपारीचा काळाबाजार सुरू झाला आहे. लॉकडाउनपूर्वी 10 रुपयाला मिळणारी तंबाखूच्या पुडीची किरकोळ विक्रीच 20 ते 25 रुपयांवर गेली आहे. खर्ऱ्यानेदेखील उच्चांक गाठत 10 ते 20 रुपयांपासून 35 ते 45 पर्यंत आपला भाव नेलेला आहे. देशी-विदेशीची जागा गावठी दारूने शंभर रुपये ग्लास, 500 रुपये बिसलेरी बॉटलने घेतलेली आहे.

भांगाच्या गोळ्यांची दुकानांमध्ये मागणी
तंबाखू जीवनावश्‍यक वस्तूंमध्ये येत नसल्याने त्याची अधिकृत वाहतूक सुरू नसल्याने तंबाखूचे व्यसन जडलेल्यांचे हाल होत आहेत. अनेकांकडून छुप्या मार्गाने आलेला माल उपलब्ध करून दिला जातो. त्याकडे संबंधित विभागाची नजर नसल्याचे चित्र आहे. दारू आणि इतर पदार्थ उपलब्ध होत नसल्याने कन्हान पोलिस ठाण्याच्या हद्दीतील काही गावातील दुकानांमध्ये भांग ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिली जात आहे. कुठे गांजाच्या पुड्या उपलब्ध होत असल्याने वयस्क तर तरुणाईदेखील गांजा आणि भांगने आपली "तलब' लॉकडाउनपर्यंत भागवू, असा विचार करत आहे. मात्र, हे व्यसन करणाऱ्यांना भविष्यात मोठी किंमत मोजावी लागू शकते तर विकणाऱ्यांनी माणुसकी गहाण ठेवल्याचे चित्र आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT