Holi 2024
Holi 2024  esakal
नागपूर

Holi 2024 : गर्भातल्या बाळासह महिलांसाठी रासायनिक रंग धोक्याचे

सकाळ वृत्तसेवा

Holi 2024 : होळीत वापरले जाणारे रसायनयुक्त रंग फक्त त्वचेसह डोळ्यांसाठीच नाहीत, तर गर्भवतीसह गर्भातील बाळांसाठीही धोक्याचे आहेत. मेडिकलमध्ये दरवर्षी अशी ८ ते १० प्रकरणे येतात. गर्भवती महिलांना रासायनिक रंगांची ॲलर्जी होते. गर्भातील बाळांवरही परिणाम होतो. त्यामुळे रासायनिक रंग होळीला टाळावेत, असा सल्ला मेडिकलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांनी दिला.

रंगपंचमीनंतर रुग्णालयांमध्ये ५० टक्के रुग्ण हे त्वचा, डोळे आणि श्वसन समस्या घेऊन येतात. यात महिला आणि बालरोग विभागात येणारे रुग्णही असतात. रासायनिक रंगांमुळे त्वचा, डोळे, कानावर परिणाम होतो. हे रंग तोंड, नाकाद्वारे शरीरात प्रवेश करतात.

रंग तयार होतात रासायनिक घटकांपासून

लाल रंग : लाल रंगात पारा सल्फाइट नावाचे रसायन असते. त्यामुळे त्वचेचे विकार तसेच कॅन्सरची शक्यता असते.

जांभळा रंग : हा रंग क्रोमियम आणि ब्रोमाइटपासून बनतो. डोळ्यात रंग गेल्यास डोळा निकामी होण्याची शक्यता असते.

हिरवा रंग : हा रंग कॉपर सल्फेटपासून बनतो. यामुळे त्वचेची जळजळ होते. डोळ्यांसाठी धोकादायक.

काळा रंग : हा रंग लीड ऑक्साईडपासून बनतो. हा सर्वाधिक घातक आहे. नाका तोंडातून शरिरात गेल्यास त्वचारोग, डोळ्यांचे आजार, किडनी विकाराची जोखीम आहे. शिवाय अंधत्व येण्याचा धोकाही आहेच.

‘रंगाचे पाणी, रंग डोळ्यात जाऊ नये यासाठी साधा चष्मा किंवा गॉगलचा वापरावा. लेन्स वापरत असाल, तर धुळवडीलाही वापरा. डोळ्यांच्या जवळ कोल्डक्रिम लावा. रंग पुसताना डोळे बंद करा आणि गरम पाण्याचा वापर करा.''

- डॉ. कविता धाबर्डे, सहयोगी प्राध्यापक, नेत्ररोग विभाग.

रासायनिक रंग कोणताही असो विषारीच असतो. त्यामुळे कोणावरही रंग लावण्याची सक्ती करू नये. तर नैसर्गिक रंगांचा वापर करावा. मेडिकलमध्ये रंग खेळणाऱ्यांपासून काही अनुचित प्रकार घडतात. यामुळे मास कॅजुल्टीची भीती असते.

- डॉ. अविनाश गावंडे, वैद्यकीय अधिक्षक, मेडिकल

मुलांच्या सुरक्षेची पालकांची जबाबदारी

मुलांकडे होळीत पालकांनी विशेष काळजी देणे आवश्यक आहे. मुलांच्या अंगावर खोबरेल तेल लावावे आणि मगच त्यांना रंग खेळू द्यावे. केसांचे नुकसान टाळण्यासाठी स्कार्फ किंवा टोपी व डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी चष्मा घालावा.

डोळ्यांवर फुगा आदळल्यास...

फुगा डोळ्यावर रंगाचा फुगा आदळल्यास कॉर्नियाला धोका पोहचू शकतो. रेटीनाला इजा होऊ शकते. अशावेळी पाण्याने डोळे स्वच्छ न करता नेत्रतज्ज्ञांकडे धाव घ्यावी. सूज आल्यास डोळे स्वच्छ पाण्याने धुवावेत. जळजळ होत असल्यास कापसाच्या बोळ्याने पापण्यांवर हळूहळू दूध सोडावे. त्यामुळे डोळ्यांना गारवा मिळतो

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Lok Sabha Election : बाबाजी‘ फॅक्टरमुळे नाशिकमध्ये ‘काटे की टक्कर', शेवटच्या दोन दिवसात आले महत्व

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: धुळ्यात एल एम सरदार हायस्कूल येथील ईव्हीएम बंद पडल्याने गोंधळ

Mobile Hacks: 'या' सोप्या ट्रिक्स वापरा, मोबाईलमधील फोटो डिलिट करण्याची येणार नाही वेळ

Lok Sabha Election: विरोधकांनीही मुस्लिम उमेदवारांना ठेवले दूर! 2019 च्या तुलनेत 2024 ची स्थिती काय?

RCB vs CSK: धोनीच्या षटकारामुळे रिंकूची आठवण... CSK विरूद्ध शेवटच्या ओव्हरला काय होत्या भावना, यश दयालच्या वडिलांकडून खुलासा

SCROLL FOR NEXT