Holi Festival 2023 do not lighting Holi on roads heat nagpur municipal corporation Sakal
नागपूर

Holi Festival 2023 : नागपूरकरांनो, होळी पेटवताना घ्या रस्त्यांची काळजी

उष्णतेमुळे डांबरी रस्ते होतात विद्रूप; महापालिकेला कोट्यवधी रुपयांचा फटका

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : अशुभ, अमंगल बाबी होळीच्या अग्नीत जाळून टाकायच्या आणि चांगल्या, शुभ गोष्टींचा स्वीकार करायचा, असा संदेश होळी सण देतो. मात्र शहरात डांबरी रस्त्यांवर होळी दहन करण्यात येत असल्याने यातून निघणाऱ्या उष्णतेमुळे रस्त्यांना फटका बसत असल्याचे चित्र पाहायला मिळते. त्यामुळे, यंदा होळी साजरी करताना या गोष्टीची काळजी घ्यायला हवी.

लॉकडाऊन हटविल्यानंतर शहरातील विकासकामांना गती आली. यात प्रामुख्याने रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणात झालेली दिसतात. गेल्या वर्षी मार्च महिन्यामध्ये होळी सणाला नागरिकांनी याच रस्त्यांवर होळी पेटविल्याने प्रत्येक वस्तीमधील डांबरी रस्त्यांचे नुकसान झालेले दिसते.

त्यामुळे, यंदा होलीका दहन करताना सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण होऊ नये, याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. आज वस्त्या-वस्त्यांमध्ये होळी दहन करण्याचे प्रमाण वाढले आहे, नागरिक या निमित्त एकत्रित येत असल्याने ही बाब स्तुत्य जरी असली तरी साधारण २५ चौरस फूट डांबराचे यामुळे नुकसान होते.

एक चौरस फूट डांबरी रस्ता बांधायचा झाल्यास यासाठी ३६ रुपयांचा खर्च येतो. प्रशासनाच्या गेल्या वर्षीच्या आकडेवारीनुसार शहरामध्ये १७ हजारांच्या जवळपास होळींचे दहन केले जाते. त्यानुसार, सुमारे १. ५३ कोटी रुपयांचे नुकसान दरवर्षी महापालिकेला होते आहे.

गल्लो-गल्ली होळी पेटवताना महापालिकेकडून त्याची परवानगी घेतली जात नाही. यामुळे, असे प्रकार पुढे येत नाही. याबाबत जनजागृती करून पैशांचा अपव्यय, नुकसान टाळायला हवे.

-मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता, नागपूर महापालिका

दोन दोन कुटुंब मिळून होळी दहन करण्याचे प्रमाण वाढल्याने होळी दहनाची संख्या वाढली आहे. याऐवजी दहा घरे मिळून एक होळी दहन केल्यास असे प्रकार, नुकसान टाळता येईल. शिवाय, वायू प्रदूषण देखील कमी होईल. परंपरेच्या नावाने अशा गोष्टींकडे दुर्लक्ष केले जाते. सार्वजनिक स्वरूपात सण साजरा केल्यास लोकांमध्ये बंधुभावही वाढेल.

-कौस्तव चॅटर्जी, पर्यावरण प्रेमी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

१०० च्या जागी ५०० तर ४०० च्या २०००... ATM मध्ये मोठी बिघाड, पैसे काढण्यासाठी लोकांची झुंबड!

Mumbai-Ahmedabad Bullet Train: देशातील पहिल्या समुद्राखालील रेल्वे बोगद्याला गती; विक्रोळीत टनेल बोरिंग मशीनचा ३५० टनांचा कटरहेड यशस्वीपणे बसवला

MHADA E-Auction: म्हाडाच्या व्यावसायिक व कार्यालयीन गाळ्यांचा ई-लिलाव; २० मेपासून नोंदणी, २४ जूनला ऑनलाइन बोली

Mira Bhayandar Virar Metro: मिरा-भाईंदर ते विरार मेट्रोसाठी १७,७२४ कोटींचा नवा प्रस्ताव; मार्ग बदलून २४.९ किमी, १७ स्थानकांची योजना

Mumbai Suburban Upgrade: दादर स्थानकावर ३४ वर्षांनंतर सिग्नल यंत्रणेचा कायापालट

SCROLL FOR NEXT