कन्हान: पोलिस ठाण्यातील बैठक आटोपून वाळू घाटाकडे मोर्चा वळविताना गृहमंत्री. 
नागपूर

गृहमंत्री थेट पोहोचले सिहोरा वाळू घाटावर, आणि फर्मावले की....

सतिश घारड/ रूपेश खंडारे

टेकाडी/पारशिवनी (जि.नागपूर):  सोमवारी तडक गृहमंत्री अनिल देशमुख पारशिवनी तालुक्‍याच्या दौ-यावर आले. अगोदर पोलिस ठाण्यात गेले. कोरोनासंदर्भात तालुक्‍यातील प्रशासनाच्या कार्याचा आढावा घेतला. आणि थेट जनतेच्या तक्रारीवर थेट सिहोरा घाटाकडे निघाले. हे पाहून अनेकांना आश्‍चर्य तर वाटलेच, पण त्यांच्या तडकफडक कृतीबद्‌दल कुतूहलही वाटले.

कडक कार्यवाही करण्याचे निर्देश
कन्हान शहरात वाढत्या अवैध वाळू वाहतुकीच्या अनेक तक्रारीचा दाखला देत महसूल विभाग, पोलिस प्रशासन व परिवहन विभागाच्या संयुक्त पथकामार्फत अवैध वाळू वाहतुकीवर कडक कार्यवाही करण्याचे निर्देश राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रशासनाला देऊन कन्हान पोलिस ठाण्यांतर्गत सिहोरा घाटाची पाहणी केली. कार्यवाही दरम्यान केवळ दंड न आकारता वाहन जप्त करण्याचेही निर्देश त्यांनी दिले. अवैध वाळू तस्करी निमित्ताने कायदा व सुव्यवस्थेबाबत पारशिवणी तालुक्‍यातील कन्हान पोलिस ठाण्यात मंगळवारी बैठक घेण्यात आली होती. तिथे ते बोलत होते.

कायदा व सुव्यवस्थेबाबत सूचना
कन्हान शहरातून अवैध वाळू व गौण खनिजांच्या वाढत्या चोरीच्या तक्रारी बघता गृहमंत्र्यांनी थेट आज कन्हान पोलिस ठाणे गाठले. त्यात कन्हान पोलिस ठाण्याच्या जीर्ण इमारतीची पाहणी करून शहरात कायदा व सुव्यवस्थेबाबत सूचना दिल्या. त्यात अवैध वाळू वाहतुकीचा प्रश्न मुख्यस्थानी होता. पार पडलेल्या बैठकीत गृहमंत्री देशमुख, ऊर्जामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, आमदार आशीष जयस्वाल, आयजी, एसपी राकेश ओला, उपविभागीय अधिकारी कट्यारे, तहसीलदार वरून सहारे, एसडीपीओ संजय पुज्जलवार, पोलिस निरीक्षक अरुण त्रिपाठी, नगराध्यक्ष करूणा आष्टणकर आदी स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

अधिक वाचा : पाहता पाहता कोरोनाने अखेर ग्रामीणही घेतले ताब्यात, काय सांगते ही आकडेवारी...

बैठकीत उडाला नियमांचा फज्जा
सर्वत्र कोरोना संसर्गाने थैमान मांडलेला असून शासनातर्फे कोरोना गाईडलाईनचे पालन करण्याचाही सूचना दिल्या जातात. कन्हान शहरातही कोरोनाचा उद्रेक सुरू असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मात्र सोशल डिस्टन्सचे पालन होताना दिसून येत नाही. यातच भर म्हणून गृहमंत्र्यांच्या बैठकी दरम्यान देखील सोशल डिटिंन्सगचा फज्जा उडाल्याचे पाहायला मिळाल्याने स्थानिय नागरिकांनी "लोकांस सांगे ब्रम्हज्ञान, स्वतः मात्र कोरडे पाषाण' असा सूर ऐकायला मिळाला.

अधिक वाचा : नागपुरात पेटणार गॅंगवार?गॅंगस्टरवर गोळीबार करणा-या टोळीला अटक

पालकमंत्र्यानीही घेतली वाळूघाटांची माहिती
जिल्हयातील सर्वात जास्त वाळूघाट पारशिवनी तालुक्‍यात आहे. या घाटातून डाव साधून वाळूचोरी होत असते. सध्या ही चोरी बंद आहे. याच घाटाच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मंगळवारी दुपारी आकस्मिक दौरा होता. पारशिवनी पोलिस ठाण्यात अचानक गुहमंत्रयांसह जिल्ह्याचे पालकमंत्री नितिन राऊत यांनी पारशिवनी भागातील घाटांची माहिती घेतली. विभागीय आयुक्त कार्यालयात वाळूचोरीवर निर्बंध लावण्यासाठी बैठक झाली होती.

संपादन : विजयकुमार राऊत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Job: एकाच पदासाठी वेगवेगळ्या परीक्षा नको, शुल्कही वाचणार! मंत्री शेलार यांची विधानसभेत माहिती

Mobile App to Predict Cancer Risk: कर्करोगाचा अंदाज आता मोबाईलवर! टाटा रुग्णालयातील संशोधकांची निर्मिती; जोखमीचे मूल्यांकन शक्य

Pune University flyover: पुण्यातील विद्यापीठ चौकाच्या उड्डाणपुलावरुन जाताना उडतोय गोंधळ; अर्धवट कामामुळे अपघाताचा धोका

उन्हाचा तडाखा वाढला! दिवसभरात प्या ४ लिटर पाणी, जिल्हा रुग्णालयात उष्माघात कक्ष, नागरिकांनी लहान मुलांची, ज्येष्ठांची कशी घ्यावी काळजी? वाचा...

Akola News : टी-२० विजयाच्या जल्लोषानंतर अकोल्यात तणाव; दोन गटात वादः वाहनांची तोडफोड, दगडफेकीत नुकसान

SCROLL FOR NEXT