How to ask for votes in front of the people for not work
How to ask for votes in front of the people for not work 
नागपूर

महापालिका निवडणूक : जनतेपुढे मत कसे मागायचे? सत्ताधारी नगरसेवकांत धूसफूस

राजेश प्रायकर

नागपूर : गेल्या वर्षभरापासून विकासकामे, वॉर्ड फंडातून होणारी कामेही बंद असल्याने सत्ताधारी नगरसेवकांतही पदाधिकाऱ्यांबाबत आता धूसफूस वाढली आहे. प्रभागात कामेच नसेल तर येणाऱ्या महापालिका निवडणुकीत जनतेपुढे मत कसे मागायचे? या प्रश्नाने सत्ताधारी नगरसेवकांना ग्रासले आहे.

पुढील वर्षी महापालिका निवडणूक होणार आहे. त्यादृष्टीने सत्ताधारी नगरसेवकांनी प्रभागातील विकासकामांवर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली. विकासकामांच्या फाईल तयार केल्या. परंतु, या सर्व फाईल्स प्रशासनाकडे प्रलंबित आहे. वर्षभरापासून प्रभागातील विकासकामे बंद असल्याने सत्ताधारी बाकावरील नगरसेवकही संतप्त झाले आहेत.

पक्षातील ज्येष्ठ नगरसेवक, महापौर, सत्तापक्ष नेते कुणीच प्रशासनाकडे भूमिका मांडत नसल्याची खंत एका नगरसेवकाने बोलून दाखवली. फेब्रुवारीमध्ये तुकाराम मुंढे आयुक्त म्हणून आल्यानंतर त्यांनी कामे बंद केली. त्यानंतर कोरोनामध्ये बराच काळ गेला.

मुंढे यांचीही बदली झाली. त्यामुळे प्रलंबित विकासकामांच्या फाईल्सचा निपटारा शक्य होता. परंतु, नगरसेवकांच्या फाईल्सकडे पदाधिकाऱ्यांचेही लक्ष नाही. एकप्रकारे पदाधिकाऱ्यांनी या नगरसेवकांना वाऱ्यावर सोडल्याचे चित्र आहे.

आयुक्त राधाकृष्णन बी. यांनीही पैसाच नसल्याचे सांगून हात झटकले असल्याचीही चर्चा नगरसेवकांत आहे. त्यामुळे ज्येष्ठ नगरसेवक, पदाधिकाऱ्यांकडून प्रशासनासोबत समन्वय साधून प्रभागातील विकासकामांना तातडीने सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज नगरसेवक व्यक्त करत आहेत. विशेष म्हणजे प्रशासनासोबत समन्वय साधण्यात महापौर, सत्तापक्ष नेते तसेच ज्येष्ठ नगरसेवक अपयशी ठरल्याची कुजबूज सत्ताधारी नगरसेवक करीत आहेत. 

सत्तापक्ष नेते कार्यालयातील रयाच गेली

यापूर्वी भाजप नगरसेवकांची सत्तापक्ष कार्यालयात सातत्याने बैठक आयोजित केली जात होती. ऐरवीही नगरसेवक सत्तापक्ष कार्यालयात येऊन सत्तापक्ष नेत्यांसोबत विकास कामांबाबत चर्चा करीत होते. परंतु गेल्या वर्षभरात कामेच होत नसल्याने नगरसेवकही सत्तापक्ष कार्यालयात फिरकतच नाही.

‘पदवीधर’मधील पराभवाने दुही

पदवीधर निवडणुकीत संदीप जोशी यांच्या पराभवानंतर सत्ताधारीही दुभंगलेले दिसून येत आहे. वेगवेगळ्या चार-पाच नगरसेवकांचे गट दिसून येत असून विकास कामांच्या फाईल्स प्रलंबित असल्याचे खापर ज्येष्ठ नगरसेवक, पदाधिकाऱ्यांवर फोडत आहे. पदवीधर मतदार संघातील पराभव जिव्हारी लागल्याने काही नगरसेवक विशिष्ट नगरसेवकांवर आरोप करीत असल्याचेही दिसून येत आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Brij Bhushan Singh: भाजपनं ब्रिजभूषण सिंहचं तिकीट कापलं! पण मुलाला दिली उमेदवारी; रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

Fridge Tips : उन्हाळ्यात फॅनला जसा आराम देतो तसा फ्रीजलाही द्यावा का? 1-2 तास बंद ठेवला तर फायदा होतो की नुकसान?

Auto-Brewery Syndrome : एक घोटही न पिता हा माणूस असतो टल्ली.. याचं शरीरच तयार करतं अल्कोहोल! जडलाय विचित्र आजार

SCROLL FOR NEXT