How can such vacancies be achieved in academic development? 
नागपूर

कसा होणार राज्याचा शैक्षणिक विकास?, तब्बल एवढी पदे रिक्‍त...

मंगेश गोमासे

नागपूर  :  महाराष्ट्र पुरोगामी राज्य म्हणून बघितल्या जाते. त्यामुळे राज्यात शैक्षणिक विकास साधण्यासाठी बऱ्याच योजना आणि अभियान राबविण्यात येतात. मात्र, या विकासाच्या मार्गात राज्याच्या शिक्षण विभागातील उपशिक्षणाधिकारी ते संचालकांपर्यंतची तब्बल 527 म्हणजेच 63 टक्के रिक्त पदे अडथळा ठरत असल्याचे निराशाजनक चित्र दिसून येत आहे. या परिस्थितीत राज्याचा शैक्षणिक विकास कसा होणार, असा प्रश्‍न पडतो आहे.

राज्यात शिक्षणाच्या विकासाच्या उद्देशाने संचालक स्तरावर आदेश काढल्यावर अगदी खालच्या स्तरावर त्याची अंमलबजावणी करण्यासाठी शिक्षणाधिकारी आणि उपशिक्षणाधिकारी प्रयत्नरत असतात. त्यामुळे राज्यात 626 उपशिक्षणाधिकारी आणि 144 शिक्षणाधिकारी पदांना मंजुरी देण्यात आली. मात्र, 626 उपशिक्षणाधिकाऱ्यांपैकी केवळ 196 पदांवरच नियमित उपशिक्षणाधिकारी कार्यरत असून, 430 पदे रिक्त आहेत. याशिवाय 144 शिक्षणाधिकाऱ्यांपैकी 96 पदे भरण्यात आलेली आहेत. याचा फटका शैक्षणिक धोरण राबविताना होताना दिसून येतो.

केवळ उपशिक्षणाधिकारीच नव्हे तर केंद्रप्रमूख आणि विस्तारअधिकारी या श्रेणीतील दोन हजारांवर पदे रिक्त आहेत. त्यामुळे विभागाची ध्येय धोरण राबविण्यासाठी बऱ्याच अडचणींना केंद्रप्रमूख आणि विस्तार अधिकाऱ्यांना सामोरे जावे लागत आहे.
दुसरीकडे शिक्षण उपसंचालक, शिक्षण सहसंचालक आणि शिक्षण संचालक यांची अनुक्रमे अशी 30, 16, 3 पदे रिक्त असून या पदांचा अतिरिक्त कार्यभार 12 शिक्षण उपसंचालक, 4 शिक्षण सहसंचालक तर 4 शिक्षण संचालकांच्या खांद्यावर आहे. विशेष म्हणजे केंद्रप्रमूख आणि विस्तारअधिकाऱ्यांवर उपशिक्षणाधिकारी पदाची धुरा देत कामे काढली जात आहेत.

1984 पासून बदल नाही
राज्य सरकारने 1984 मध्ये उपशिक्षणाधिकारी ते संचालकांपर्यंतची 839 पदांची निर्मिती केली. यानंतर राज्यात शाळा, विद्यार्थी चौपट पटीने वाढले. मात्र, आजही पदांची संख्या तेवढीच आहे. विशेष म्हणजे काळानुसार पदांच्या संख्येत वाढ अपेक्षित असताना ती झाल्याचे दिसून येत नाही.

पद - मान्य पदे - कार्यरत पदे - रिक्त पदे - टक्केवारी

  • उपशिक्षणाधिकारी- 626- 196 - 430- 70
  • शिक्षणाधिकारी - 144 - 96 - 48 - 33
  • शिक्षण उपसंचालक - 42 - 12 - 30 71
  • शिक्षण सहसंचालक - 20 - 4 - 16 - 80
  • शिक्षण संचालक - 7 - 4 - 3 - 43
  • एकूण - 839 - 312 - 527 - 63

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Student Agitation : एमपीएससी विद्यार्थ्यांचा रविवारी एल्गार! एसएम जोशी पुलावर ठिय्या आंदोलनाचा इशारा

National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधींचं दिल्ली उच्च न्यायालयात उत्तर; ईडीच्या कारवाईवर घेतला आक्षेप

Pune News : पाझर तलावांचा साठा घटला; पाणी उपशावर निर्बंध, झेडपीच्या जलव्यवस्थापन समितीकडून अधिकाऱ्यांना निर्देश

Modi Cabinet: उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार? मोदींची दोन दिवसीय चिंतन बैठक कशासाठी?

हा तर दरोडा! कॅन्सरच्या २७०० रुपयांच्या औषधाची MRP २७ हजार, रुग्णांच्या लुटीवर अधिकारी गप्प का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

SCROLL FOR NEXT