How did the "coronablast" happen in prison? 
नागपूर

कारागृहात कसा झाला "कोरोनाब्लास्ट' ?

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : मध्यवर्ती कारागृहात आज आणखी 30 जण कोरोनाबाधित आढळले असून तेथील संख्या शतकापर्यंत पोहोचली. त्यामुळे मध्यवर्ती कारागृह आता कोरोनाचे नवे हॉटस्पॉट झाले आहे. मध्यवर्ती कारागृहातील 30 जणांसह शहरात आज 58 जणांना कोरोना झाल्याचे निदान झाले. शहरातील एकूण बाधितांची संख्या 1681 झाली असून लॉकडाऊन सैल होताच शहराला कोरोनाचा विळखा घट्ट होत असल्याचे चित्र आहे. 

मध्यवर्ती कारागृह सध्या कोरोनाच्या हिटलिस्टवर असल्याचे दिसून येत आहे. मंगळवारपासून कारागृहाला कोरोनाने विळखा घालण्यास सुरुवात केली. बुधवारी अचानक 44 जण कोरोनाबाधित आढळले. काल, गुरुवारी यात 12 जणांची भर पडली. आज येथील 30 जणांना कोरोनाची बाधा झाली. त्यामुळे कारागृहातील कोरोनाबाधितांची संख्या आता 96 झाली आहे.

दरम्यान, आज कारागृहातील 30 जणांशिवाय शहरातील इतर भागात 28, असे एकूण 58 जण कोरोनाबाधित आढळून आले. सतरंजीपुरा, मोमिनपुरा आणि बांगलादेशनंतर कारागृहात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित आढळून आले. गेल्या तीन दिवसांत कारागृहातील संख्या शतकापर्यंत पोहोचली आहे. लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर शहरात सातत्याने कोरोनाबाधितांचा आकडा वेगाने वाढत आहे.

कोरोनाबाधिताची संख्या सतराशेकडे वाटचाल करीत असून आरोग्य यंत्रणेसोबत आता कारागृहातील पोलिस, कैद्यांच्या जीवालाही घोर लागला आहे. कोरोनाबाधितांना एम्स, मेडिकल तसेच मेयो रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. व्हीएनआयटी विलगीकरण केंद्रातील 12 जणांचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला.

मनीषनगर तसेच फ्रेन्डस कॉलनी परिसरातून प्रत्येकी एक कोरोनाबाधित आढळून आल्याने या परिसरातही खळबळ उडाली आहे. इतर सर्व व्हीएनआटी, राजनगर, पाचपावली विलगीकरणातील नागरिक आहेत. 

तीन दिवसांत 103 बाधित 
1 जुलै रोजी कोरोनाबाधितांची संख्या 1578 होती. गेल्या तीन दिवसांत 103 बाधितांची भर पडली. लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर कोरोना वेगाने वाढत असून नागरिकांनी नियम पाळण्याचे आवाहन महापालिका, आरोग्य विभागाने केले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bharat Gogawale on Manoj Jarange Patil : "कोणी ऐऱ्यागैऱ्याने त्याचे श्रेय घेऊन ठाण्याला आव्हान देऊ नये,”, भरत गोगावलेंचे मनोज जरांगेंवर थेट आरोप

Fertilizer Allocation System : आधार, सातबारा अन् पिकानुसार ठरणार खतांचा कोटा ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ प्रणाली; वाळवा पंचायत समितीत खत विक्रेत्यांना प्रशिक्षण

Asian Games 2026: दीपिका सेहरावतचे रेकॉर्ड ब्रेकिंग गोल! थायलंडवर २०-१ असा दणदणीत विजय; १९८२ नंतर सुवर्णपदकाच्या शोधात

Marathi News Live Updates : पक्ष फोडणाऱ्या टोळीचे मुख्य सूत्रधार ज्ञानेश कुमारच, त्यांचा तातडीने राजीनामा घ्या; उद्धव ठाकरे आक्रमक

Uddhav Thackeray Eknath Shinde : वसंत डावखरे मानहानी प्रकरणाचा १७ वर्षांनी निकाल; उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंबाबत कल्याण न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

SCROLL FOR NEXT