सायली वाघमारे 
नागपूर

Video : नोकरीसाठी आणखी किती मेहनत घ्यायची ? राष्ट्रीय महिला धावपटूचा सवाल

नरेंद्र चोरे

नागपूर : कोणताही खेळाडूल उज्ज्वल करिअर व उदरनिर्वाहासाठी एका नोकरीची अपेक्षा असते. याच माफक अपेक्षेने नागपूरची धावपटू सायली वाघमारेही बारा वर्षांपूर्वी मैदानात उतरली होती. राष्ट्रीय स्तरावर सातत्याने चमकदार कामगिरी करूनही अद्याप तिला नोकरी मिळाली नाही. त्यामुळे नोकरीसाठी खेळाडूने आणखी किती मेहनत करायची, किती पदके मिळवायची असा सवाल सायलीने विचारला आहे.


वयाच्या बाराव्या वर्षी धावायला सुरूवात करणाऱ्या सायलीने अल्पावधीतच जिल्हा, विभागीय व राज्य स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी बजावून आपल्यातील टॅलेंटचा जगाला परिचय करून दिला. राष्ट्रीय स्तरावर तिने 2017 मध्ये गुटूंर येथे झालेल्या अ. भा. आंतर विद्‌यापीठ स्पर्धेत सुवर्णपदक, 2016 मध्ये कोईम्बतूर येथील स्पर्धेत रौप्यपदक, 2015 मध्ये मंगलोर येथील स्पर्धेत ब्रॉंझपदक, रांची येथील ज्युनियर नॅशनल स्पर्धेत सुवर्णपदक, लखनौ येथील युथ नॅशनलमध्ये सुवर्णपदकाशिवाय इटावा, जालंधर व इतरही अनेक स्पर्धांमध्ये आपली अमिट छाप सोडली.

याशिवाय आशियाई, वर्ल्ड युथ ऍथलेटिक्‍स स्पर्धा व पतियाळा येथे राष्ट्रकुल स्पर्धेच्या चाचणीसाठीही तिची निवड करण्यात आली. मात्र दोन्ही वेळा अंतिम क्षणी दुखापतीमुळे तिची आंतरराष्ट्रीय संधी हुकली. राज्य व राष्ट्रीय स्पर्धा गाजवित असताना 24 वर्षीय सायलीने नोकरीसाठी रेल्वे, इनकम टॅक्‍ससह अनेक ठिकाणी प्रयत्न केले. "ट्रायल्स'मध्ये चांगले "टायमिंग' देऊनही तिला नोकरी मिळाली नाही. अंतिम क्षणी माशी कुठे शिंकते, हे तिलाही आजपर्यंत समजले नाही.

पाच टक्के कोट्यासाठीही केला अर्ज

"सीएम'च्या पाच टक्‍के कोट्यासाठीही तिने अर्ज केला होता. तिथेही दुर्दैवाने आड आले. त्यामुळे कधीकधी "स्पोर्टस' सोडून देण्याचा विचारही तिच्या मनात आला. नाइलाजाने आता एमपीएससीवर भर द्यावा लागत असल्याची व्यथा तिने बोलून दाखविली. आता तर कोरोनामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. नोकरी मिळाली नाही तर काय होईल हा प्रश्न तिला सतावतो आहे.

आणखी वाचा - कोरोनामुळे पुस्तकेही कुलुपात, राज्यातील तब्बल बारा हजार ग्रंथालये बंदच
तिच्या करिअरला दुखापतींचा सर्वाधिक फटका बसला. झाले गेले विसरून सध्या अभ्यास व राष्ट्रीय स्पर्धेची तयारी करीत असलेल्या सायलीने आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देशासाठी पदक जिंकण्याची इच्छा बोलून दाखविली. जितेंद्र घोरदडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणाऱ्या सायलीचे वडील किशोर वाघमारे नागपूर जिल्हा को. ऑप. बॅंकेत कार्यरत होते. गेल्या मार्चमध्येच ते निवृत्त झाले. तर आई गृहिणी आहे. वडिलांची जेमतेमच पेंशन. त्यात वाघमारे परिवाराचा मोठ्या मुश्‍किलीने उदरनिर्वाह चालतो. भाऊ इलेक्‍ट्रिकची कामे व वहिनी ब्युटीपार्लरचे काम करून सध्या कुटूंबाला आधार देत आहेत. सायलीला मदतीसाठी ९११९४९८९३६ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.


सायलीचा संघर्ष मी पहिल्या दिवसापासून पाहतो आहे. तिने गेल्या दहा-बारा वर्षांमध्ये प्रचंड मेहनत घेतली आहे. तिला पाहिजे तसे फळ मिळाले नाही. धावपटूला "स्टॅमिना' वाढविण्यासाठी सकस आहारही तितकाच आवश्‍यक असतो. आजच्या घडीला एका साधारण परिवारातील खेळाडू एवढा मोठा खर्च करूच शकत नाही. म्हणूनच सायलीला सद्यस्थितीत नोकरीची नितांत गरज आहे.
जितेंद्र घोरदडेकर, सायलीचे प्रशिक्षक  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: संतापजनक! शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त दिसलं, मासिक पाळीच्या संशयातून मुलींना विवस्त्र केलं अन्...; ठाण्यातील प्रकारानं खळबळ

Video Viral: शुभमन गिलला समोरून जाताना पाहून काय होती सारा तेंडुलकरची रिऍक्शन? पाहा

Viral Video: धक्कादायक! लिफ्टमध्ये लहान मुलाला जबर मारहाण; ठाण्यातील संतापजनक घटना, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीच्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी सांस्कृतिक चित्रपट विभागाने घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांचा जीव देण्याचा प्रयत्न, तिघांचा मृत्यू; घटनेमागचं कारण काय?

SCROLL FOR NEXT