Dolly Chaiwala Net Worth Esakal
नागपूर

Dolly Chaiwala Net Worth: बिल गेट्स यांना चहाची भूरळ घालणाऱ्या डॉली चायवाला याची संपत्ती किती? जाणून घ्या

Dolly Chaiwala Net worth: बिल गेट्स यांना चहा देणाऱ्या डॉली चायवाला सध्या सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहे. याविषयी जाणून घेऊया.

अंकिता खाणे (Ankita Khane)

चमकदार शर्ट, चष्मा आणि रंगीबेरंगी असा लूक असलेल्या डॉली चायवाल्याची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरू आहे. मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी त्यांच्या हातचा चहा प्यायला. मात्र, जेव्हा बिल गेट्स त्याच्या टपरीजवळ चहा प्यायला गेले तेव्हा त्याला त्यांची माहिती नव्हती, असे डॉली चायवाल्याने सांगितले. त्यावेळी त्याला वाटले की ते परदेशी नागरिक आहोत.

मात्र, सध्या सुपर बाईक आणि लॅम्बोर्गिनीसोबत डॉलीचा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे.चला तर मग जाणून घेऊया डॉली चायवालाकडे किती मालमत्ता आहे.

डॉली चायवाला सोशल मीडियावर त्यांच्या स्टाइलसाठी प्रसिद्ध आहे. तो प्रथम अनोख्या शैलीत लोकांचे स्वागत करतो आणि नंतर रजनीकांत शैलीत त्यांना चहा देतो. तो त्याच्या स्वॅगमुळे सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे. ज्याचा अंदाज तुम्ही त्यांच्याशी बोलूनच लावू शकता. त्याच्या टपरीवर कोट्यधीशही चहा प्यायला येतात.

डॉली चायवालाची किती मालमत्ता आहे?

अनेक सेलिब्रिटीही डॉलीच्या चहाचे वेडे असून त्याच्या टपरीवर चहा प्यायला येतात. मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनीही डॉलीच्या टपरीवर चहा पितानाचा व्हिडिओ शेअर केला आणि लिहिले की, भारतात तुम्हाला सर्वत्र नावीन्य मिळू शकते. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या डॉलीबद्दल बोलताना मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याच्याकडे 10 लाख रुपयांची संपत्ती आहे. मात्र, बिल गेट्सने त्यांच्या टपरीवर चहा प्यायल्यानंतर तो चांगलाच प्रसिद्ध झाला आहे.

16 वर्षांपासून सुरू आहे चहाचा स्टॉल

तो गेल्या 16 वर्षांपासून महाराष्ट्रातील नागपुरात चहाचा स्टॉल लावत आहे. दहावीनंतर डॉलीने चहापानामुळे अभ्यास सोडला. अनेक चांगले लोक त्यांच्या चहाचे चाहते आहेत. त्यांच्या चहाच्या स्टॉलमधून त्यांना चांगली कमाई होते. मात्र, जेव्हापासून बिल गेट्स यांनी त्याच्या टपरीवर चहा प्यायला, तेव्हापासून त्याला लॉटरी लागल्यासारखे वाटते आहे.

चहाचा लागला नाद अन् शाळा सोडली

नागपूरमध्ये डॉली चहावाल्याची वेगळी ओळख आहे. या व्यक्तीने 10वी नंतर शिक्षण सोडले आणि गेल्या 16 वर्षांपासून नागपुरातील सिव्हिल लाईन्सजवळ चहाचे दुकान चालवत आहे. त्याचे खरे नाव सुनील पाटील आहे.

डॉलीच्या चहाच्या स्टॉलवर जो कोणी चहा प्यायला येतो तो त्याच्या स्टाइल आणि चवीचा चाहता होतो. सकाळी 6 ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत त्याचा स्टॉल सुरु असतो. डॉली चहाची किंमत सात रुपये आहे. दिवसाला तो 350 ते 500 कप चहा विकतो. त्याची दिवसाची कमाई जवळपास 3,500 रुपये आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT