how transgenders completes their funerals read full story  
नागपूर

नक्की कसे होतात किन्नरांवर अंत्यसंस्कार? काय आहेत प्रथा आणि परंपरा.. एकदा वाचाच  

अथर्व महांकाळ

नागपूर: किन्नर म्हंटले की आपल्या डोळ्यासमोर येतात पैसे मागणारे लोकं. पण किन्नरांची फक्त हीच ओळख नाही. घरी असलेल्या शुभकार्यात किन्नर येणे शुभ मानले जाते. तसेच त्यांचे आशीर्वाद घेणे ही शुभ असते. मात्र समाजात अजूनही त्यांना दुय्यम दर्जा दिला जातो हेच दुर्भाग्य आहे. आज आम्ही तुम्हाला त्यांच्याविषयी एक अनोखी गोष्ट सांगणार आहोत.   

जगाला आशीर्वाद देऊन हे किन्नर जेव्हा वैकुंठ गमन करतात तेव्हा त्यांचावर अंत्यसंस्कार कसा केला जातो? नक्की कोणत्या धर्माप्रमाणे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतात? कोणत्या प्रथा आणि परंपरा यात पाळल्या जातात? या सर्व प्रश्नांची उत्तर आम्ही तुम्हाला आज देणार आहोत.        

सामान्य लोकांना नो एन्ट्री 

किन्नरांना त्यांच्या दु: खामध्ये गैर-किन्नर लोकांना समाविष्ट करणे त्यांना आवडत नाही. यामागील एक छुपे रहस्यही दडलेले आहे. जेव्हा जेव्हा एखादा किन्नराचा मृत्यू होतो तेव्हा किन्नर लोक सामान्य लोकांना अंत्यविधीच्या सामील करून घेत नाहीत. असा समज आहे की सामान्य माणसाने किन्नर लोकांचे शेवटचे अंत्यसंस्कार पाहिल्यास पुढच्या आयुष्यात तोसुद्धा किन्नर बनतो.

मृतदेहाला मारल्या जातात चप्पल 

किन्नरांच्या अंत्यसंस्कारावेळी बाकीचे किन्नर मृत शरीराला चप्पलने मारहाण करतात. असे म्हणतात की असे केल्यामुळे त्याला या जन्मात केलेल्या पापांपासून मुक्ती मिळते. तसंच पुढील जन्म किन्नरांचा मिळत नाही. याशिवाय किन्नरच्या मृत्यूनंतर त्या समाजातील लोक एक आठवडा अन्नही खात नाहीत. 

मृतदेहाला करतात दफन 

 किन्नर समाज सर्व हिंदू परंपरांचे पालन करतो. मात्र परंतु शेवटच्या संस्कारांच्या वेळी त्यांचे शरीर जाळण्याऐवजी दफन केले जाते. ही प्रक्रिया रात्री केली जाते जेणेकरुन सामान्य लोकांना ते दिसू शकत नाही.

दुखवटा पाळत नाही

किन्नर समाज त्याच्या मृत्यूने शोक व्यक्त करत नाही. उलट किन्नरच्या मृत्यूवर किन्नर लोक आनंद साजरा करतात. असे म्हणतात की मृत्यूनंतर, किन्नराला या नरक युगी जीवनापासून स्वातंत्र्य मिळते. पुढच्या आयुष्यात तो सामान्य माणसासारखा जन्माला येतो. किन्नर बनून जन्माला येत नाही. 

किन्नरांना अजूनही समाजात हाये ते स्थान मिळू शकले नाहीये.  मात्र त्यांना नेहमी आदराने सन्मानाने वागणूक देणे हे आपले कर्तव्य आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात २ तरुणींचा १९ वर्षीय तरुणावर पहाटे कोयत्यानं हल्ला, घटना CCTVत कैद; धक्कादायक कारण समोर

Dodamarg Eco-Sensitive Area : 'महाराष्ट्राचे ॲमेझॉन' धोक्यात! केंद्राकडून दोडामार्ग तालुका वगळण्याची 'घोड चूक'; वनशक्ती संस्थेचे सरकारला थेट पत्र

Kolhapur Voter List Revision : कोल्हापूर जिल्ह्यातील साडेचार लाख मतदार वगळणार; 'एसआयआर'चे 99.91 टक्के काम पूर्ण, पाहा विधानसभा मतदारसंघनिहाय चित्र

Marathi News Live Updates : भोर तालुक्यातील खड्ड्यांमध्ये भात लावून विद्यार्थ्यांनी वेधले प्रशासनाचे लक्ष

World Record Tiranga Rally: डोंबिवलीत तिरंग्याचा विश्वविक्रमी डौल, ३५ हजार चौरस फुटांच्या ध्वजासह भव्य रॅली

SCROLL FOR NEXT