How to "upload" marksheet in lockdown?  
नागपूर

टाळेबंदीत कशी "अपलोड' करणार गुणपत्रिका?

मंगेश गोमासे

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने महाविद्यालय स्तरावर होणाऱ्या पदवी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना प्रथम विद्यापीठाची नोंदणी करीत दहावी आणि बारावी गुणपत्रिका अपलोड करण्याचे निर्देश दिलेत. मात्र, टाळेबंदी लावण्यात आली असताना विद्यार्थी कागदपत्रे कशी अपलोड करणार, असा सवाल प्राचार्य फोरमने उपस्थित करीत विद्यापीठ स्तरावरील नोंदणी मागे घेण्याची मागणी प्र-कुलगुरू डॉ. एस. आर. चौधरी यांना निवेदनातून केली आहे.

बारावीचा निकाल लागताच पदवी प्रवेश सुरू होतात. शुक्रवारी विद्यापीठाने पदवी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करीत यासाठी विद्यापीठाच्या पोर्टलवर विद्यार्थ्यांना नोंदणी करणे अनिवार्य केले. शिवाय, विद्यार्थ्यांना दहावी आणि बारावीची गुणपत्रिका अपलोड करावयाची आहे. नोंदणी होताच विद्यार्थ्यांना एक नोंदणी क्रमांक मिळेल. यानंतर महाविद्यालयांमध्ये पुन्हा नोंदणी करून संबंधित कागदपत्रे द्यावयाची आहेत.

नोंदणी संपल्यावर दोन दिवसांनी गुणवत्ता यादी प्रकाशित करण्यात येईल. या यादीनुसार त्या-त्या महाविद्यालयात विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यावयाचा आहे. तत्पूर्वी महाविद्यालयात विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष आणि ऑनलाइन पद्धतीने कागदपत्रांची तपासणी करावी लागणार आहे. तपासणी होताच विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्‍चित होऊन त्याला प्रवेश देण्यात येणार आहे.

कोरोनाच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. ग्रामीण भागात इंटरनेट कॅफे वा इतर सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे अशा परिस्थितीत ऑनलाइन नोंदणी करून त्यावर कागदपत्रे कशी डाउनलोड करता येतील, असा सवाल महाविद्यालयातील प्राचार्यांनी उपस्थित केला आहे. यासंदर्भात शनिवारी, विद्यापीठाचे प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. एस. आर. चौधरी यांचासोबत प्राचार्य फोरमने चर्चा करून मागण्यांचे निवेदन सादर केले. मात्र, त्याबाबत राज्यपालांचे आदेश असल्याचे सांगून कुठलेही उत्तर देण्यास त्यांनी नकार दिल्याचे प्राचार्य फोरमचे अध्यक्ष डॉ. आर. जी. टाले यांनी सांगितले.

व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांचाही विरोध
प्रवेशादरम्यान विद्यापीठ आणि महाविद्यालयाची नोंदणी करणे कुठल्या विद्यापीठात आहे, असा सवाल व्यवस्थापन परिषदेचे ज्येष्ठ सदस्य डॉ. आर. जी. भोयर यांनी उपस्थित केला असून या निर्णयाला विरोध दर्शविला आहे. विशेष म्हणजे, ग्रामीण भागात इंटरनेट आणि इतर सुविधा नसल्याने विद्यार्थी कशी कागदपत्रे डाउनलोड करतील, हा प्रश्‍न आहे. विद्यापीठाने याचा विचार न करताच हा निर्णय घेतला असल्याचे ते म्हणाले.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Saurabh Das Contempt Case : 'सीजेपी'चे प्रवक्ते सौरभ दास पुन्हा वादाच्या भोवऱ्यात! मानहानी आणि कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी वाढला न्यायालयीन फेरा, काय आहे प्रकरण?

Khade Hanuman: नव्या जागेवर मंदिर तयार पण हनुमानजी जागचे हलेनात; उज्जैनमध्ये दक्षिणमुखी अन् उत्तरमुखी समस्या काय आहे?

Duleep Trophy Winner: ईशान किशनच्या संघाने जिंकले विजेतेपद! तिलक वर्माच्या संघाविरुद्ध फायलनमध्ये केलेल्या १००० हून अधिक धावा

Mumbai Local: लोकलमधून जीवघेणा प्रवास! दिवा-मुंब्रा वळणावर ट्रेन येताच महिला खाली पडली, धडकी भरवणारा VIDEO VIRAL

Marathi News Live Updates : गणेशोत्सवात गैरहिंदू ठेकेदारांना कामे देऊ नका; भाजप गटनेत्याच्या पत्राने खळबळ

SCROLL FOR NEXT