How will 10th and 12th class students of Municipal School achieve success? 
नागपूर

मनपा शाळेतील दहावी, बारावीचे विद्यार्थी कसे मिळविणार यश ? वाचा

राजेश प्रायकर

नागपूर : कोरोनामुळे शाळांऐवजी ऑनलाईन शिक्षणावर भर देण्यात येत आहे. महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थी खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांच्या तुलनेत कुठेही कमी राहू नये, यासाठी महापालिकेनेही ऑनलाईन शिक्षण सुरू केले. आता पालिकेने दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणासाठी मोफत टॅब उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव तयार केला असल्याचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले.

सभागृहात हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर महापालिका शाळांत शिक्षणारा गरीब विद्यार्थीही बोर्डाच्या परिक्षेत चांगले गुण घेत भविष्याचा पाया मजबूत करण्यास सक्षम होणार आहे.

कोरोनामुळे शाळा बंद आहेत. त्यामुळे सर्वच शिक्षण संस्थांनी ऑनलाईन वर्ग सुरू केले. महापालिकेनेही ऑनलाईन शाळा सुरू केली. महापालिकेने खाजगी शाळांच्या एक पाऊल पुढे जात दहावी व बारावीतील एकूण १९०० विद्यार्थ्यांना टॅब देण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

टॅब देऊन इंटरनेट नसेल तर ते काहीच कामाचे नसेल, हा विचार करीत महापालिकेने विद्यार्थ्यांना इंटरनेटही उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे प्रत्येक अभ्यासक्रमाचे एक सॉफ्टवेअर तयार करण्यात येणार असल्याचे मनपाच्या शिक्षणाधिकारी प्रीती मिश्रीकोटकर यांनी सांगितले. यावर दोन कोटी खर्च होणार आहे.

याबाबतच प्रस्ताव शिक्षण विभागाने तयार केला असून तो सभागृहाकडे पाठविण्यात येणार आहे. नुकताच लागलेल्या मनपा शाळांतील दहावीच्या विद्यार्थ्यांनी भरघोस यश मिळविले. ही यशाची परंपरा पुढे कायम ठेवण्यासाठी मुंढे यांनी पाऊल उचलले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance Tips: हेल्थ इन्शुरन्स घेताना या गोष्टी तपासल्या नाहीत तर Claimच्या वेळी बसू शकतो मोठा धक्का!

IND vs WI: मॅचच्या काही तास आधी मोठं संकट! इकाना स्टेडियमजवळ गोमतीचं पाणी, अंडरपास जलमय; भारत-वेस्ट इंडिजच्या सामन्यावर प्रश्नचिन्ह?

‘मला पाहून महिला थुंकायला आणि चपलेने मारायला यायच्या’; दृश्यममधील गायतोंडे फेम कमलेश सावंत म्हणाले...‘ही खंत आयुष्यभर राहील’

Marathi News Live Updates: ऑक्टोबरच्या उकाड्यानंतर कर्जतला पहाटे दाट धुक्याची चादर; आल्हाददायक वातावरणाने नागरिक सुखावले

Kolhapur Gokul Election: ‘गोकुळ’च्या एका जागेवरून महायुतीत तिढा; राष्ट्रवादीला आणखी एक जागा, यड्रावकर गटाच्या जागेवरून घमासान

SCROLL FOR NEXT