How will Nagpur become the 'Bicycle Capital of India'? Read detailed 
नागपूर

नागपूर कसे होणार ‘बायसिकल कॅपिटल ऑफ इंडिया' ? वाचा सविस्तर

राजेश प्रायकर

नागपूर : शहरातील रस्ते उत्तम असून सायकलिंगसाठी पूरक वातावरण आहे. कोव्हीडनंतरच्या काळात व्यायामासोबतच प्रदुषणमुक्तीवर भर राहणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या उपक्रमाचा लाभ मिळवून देत नागपूरला बायसिकल कॅपिटल ऑफ इंडिया करण्याचा संकल्प असल्याचे एनएसएससीडीसीएलचे (स्मार्ट सिटी कंपनी) मुख्य कार्यकारी अधिकारी महेश मोरोणे यांनी ‘सकाळ'ला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले. सीएसआर फंडातून एका संस्थेने दहा सायकल भेट दिल्या असून पाचशेपर्यंत सायकल विविध संस्थांकडून मिळविण्यात येईल. यातील चारशे सायकल गरीबांना वितरित केल्या जाणार असल्याची पुस्तीही त्यांनी जोडली.
केंद्र सरकारच्या गृह निर्माण व शहरी ‍विकास मंत्रालयातर्फे ‘इंडिया सायकल्स फॉर चेंज चॅलेंज' हा उपक्रम सुरू आहे. देशभरातील १०० स्मार्ट सिटीपैकी ९५ शहरांनी या उपक्रमात भाग घेतला असून यात, नागपूर शहराचाही समावेश असल्याचे त्यांनी नमुद केले. या उपक्रमाचा लाभ घेत शहराला एक वेगळी ओळख निर्माण करून देण्याचा निर्धार व्यक्त करताना शहरात १८ किमीचा सायकल ट्रॅकचे काम सुरू असल्याचे ते म्हणाले.

यावर दोन कोटींचा खर्च केले जाणार आहे. परंतु स्मार्ट सिटी कंपनीचा एकही रुपया खर्च न करता सीएसआर फंडातून ही कामे केली जाणार आहे. दुभाजक असलेल्या रस्त्यांच्या दोन्ही बाजूने तर दुभाजक नसलेल्या रस्त्यांच्या एका बाजूला सायकल ट्रॅक तयार करण्यात येईल. याबाबतचा पथदर्शी प्रकल्प लॉ कॉलेज चौकपासून १८ किमीचा राहणार असल्याचे ते म्हणाले. हा उपक्रम तीन टप्प्यात पार पडणार आहे.

पहिल्या टप्प्यात २० ऑॅक्टोबरपर्यंत नागपूरला बायसिकल कॅपिटल ऑफ इंडिया करण्यासाठी ३० हजार नागरिकांचा अभिप्राय घेण्याचे आव्हान आहे. यासाठी ऑनलाईन फॉर्म भरून घेण्यात येणार असून लिंक पाठविण्यास सुरूवात करण्यात आली आहे. या उपक्रमाच्या अंमलबजावणी करण्यासाठी कोअर कमिटी तयार करण्यात आली. कमिटीची स्थापना, सायकल लेन कमी कालावधीत तयार करणारे नागपूर पहिले शहर असून सरकारच्या वाहतूक धोरणात मदत करणाऱ्या आयपीडीपी कंपनीनेही कौतुक केल्याचे मोरोणे म्हणाले.
 
१ कोटींचा पुरस्कार जिंकणारच
पहिल्या टप्प्यात २० ऑक्टोबरपर्यंत करण्यात येणाऱ्या विविध कामांच्या आधारावर ९५ पैकी ११ शहरांची निवड केली जाणार आहे. या शहरांना एक कोटींचा पुरस्कार मिळणार आहे. हा पुरस्कार नागपूर जिंकणारच, असा विश्वास मोरोणे यांनी व्यक्त केला. यासाठी नागपूरकरांची मते घेण्यात येणार आहे. दर शनिवारी सायकलच्या वापरासंदर्भात जनजागृती करण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले.
 
स्मार्ट सिटीसाठी कंत्राटदारांना मुदतवाढ
स्मार्ट सिटी प्रकल्पाची कामे रखडली. यासाठी पावसाळा, कोव्हीड आदी विविध कारणे आहे. परंतु गृहबांधणी प्रकल्पासाठी शांती कन्स्ट्रक्शन कंपनीला ३० जून २०२१ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. मार्च २०२१ पर्यंत ७५ टक्के कामे पूर्ण होतील. १०२४ घरांचा हा प्रकल्प आहे. याशिवाय स्मार्ट सिटी अंतर्गत पूर्व नागपुरात या महिन्‍याच्या शेवटी पाच रस्त्यांची कामे पूर्ण होईल, असेही त्यांनी सांगितले. रस्त्‍यांची कामे करणाऱ्या कंपनीलाही मुदतवाढ दिल्याचे ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPFO: आता नोकरी बदलली तरी पीएफची चिंता नाही! PF आपोआप ट्रान्सफर होणार; पण कसा? वाचा ईपीएफओचा मोठा निर्णय

IND vs SA, 3rd T20I: अभिषेक शर्मा बरसला, शुभमन गिलनेही दिली साथ; टीम इंडियाची दणदणीत विजयासह मालिकेत आघाडी

गोतस्करी करणारी वाहने स्क्रॅप करावीत! आमदार कोठे यांची अधिवेशनात मागणी; सोलापुरात पुढच्या शैक्षणिक वर्षात सुरु होणार शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय

IND vs SA, T20I: जसप्रीत बुमराह अचानक घरी गेला, पुढच्या दोन टी२० सामन्यात खेळणार की नाही? BCCI ने दिले अपडेट

३० हजार फूट उंचीवर मृत्यूशी झुंज! इंडिगो विमानात घडलेला तो थरारक क्षण! कोल्हापूरकर डॉक्टर बनल्या 'देवदूत'

SCROLL FOR NEXT