Crime News Crime News
नागपूर

झुडपात आढळळी मानवी कवटी; बेपत्ता महिलेच्या हत्येचा संशय

सकाळ डिजिटल टीम

भिवापूर (जि. नागपूर) : कोलारी नजीकच्या नाल्याच्या काठावरील झुडपात मानवी कवटी (Human Skull found in a bush) आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेच्या तीन दिवसांपूर्वी याच परिसरात महिलेची साडी व इतर वस्त्र आढळून आले होते. कवटी व कपडे हे पाच महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या कोलारी येथील ३२ वर्षीय विधवा महिलेचे असावे, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांचा त्या दिशेने तपास सुरू आहे.

कोलारी येथील शेतकरी भालचंद्र धनविजे सकाळी शेतावर जात असताना पंढरी वैरागडे यांच्या शेताजवळील नाल्याच्या काठावर त्यांना मानवी कवटी दिसून आली. पोलिसांना माहिती मिळताच ठाणेदार महेश भोरटेकर यांच्या नेतृत्वात परिसराची पाहणी करण्यात आली. पंचनाम्यानंतर कवटी ताब्यात घेऊन फाँरेंसिक चाचणीसाठी नागपूरला पाठविण्यात आली. या घटनेच्या तीन दिवसांपूर्वी बुधवारी (ता. १६) याच परिसरात महिलेची साडी व इतर वस्त्रे आढळून आले होते. या कपड्यांच्या बाजूला जनावराचे मुंडके व हाडे पडलेली होती. आता मानवी कवटी आढळून आल्याने ती महिलेचीच असावी असा कयास वर्तविण्यात येत आहे.

प्रमिला अचानक झाली होती बेपत्ता

कोलारी येथील प्रमिला मारोती धनविजे (वय ३२) ही विधवा महिला १ ऑक्टोंबर २०२१ पासून बेपत्ता आहे. तिचा भाऊ रवींद्र शेंडे याने ९ ऑक्टोबर २०२१ ला दिलेल्या तक्रारीवरून भिवापूर पोलिसांत ती हरविल्याची तक्रार नोंदविली होती. तेव्हापासून पोलिस तिचा शोध घेत आहेत. बेवारस स्थितीत आढळून आलेले कपडे व मानवी कवटी (Human Skull found in a bush) ही बेपत्ता महिलेचीच असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. अचानक ती बेपत्ता झाली व पाच महिन्यांनंतर गावाजवळच मानवी कवटी व कपडे आढळून आल्याने महिलेची हत्या केल्याचा संशय बळावला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Municipal Corporation Election 2026 Voting LIVE Updates : पुण्यात निलम गोऱ्हे यांनी बजावला हक्क म्हणाल्या

Bangladesh Cricket: बांगलादेश क्रिकेटपटूचं बंड! भारताला धमकी देणाऱ्या BCB विरोधात आक्रमक; बहिष्काराची भाषा

Mumbai Mahapalika Elections: मुंबईत पहिला दुबार मतदार आढळला; मनसेच्या उमेदवारासमोरच घडली घटना, सुरक्षा यंत्रणांची जोरदार धावपळ

Pune News : धायरी फाट्यावर मतदान केंद्रावर शाई पुसण्याचा प्रयत्न; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दिला चोप

Nana Patekar Voting : पुणे ते मुंबई प्रवास करत नाना पाटेकरांनी मतदानाचा हक्क बजावला, मराठीमध्ये आवाहन करत म्हणाले, आपला हक्क...

SCROLL FOR NEXT