file 
नागपूर

बापरे! भूमिहीन शेतकऱ्यांच्या नावे शंभर कोटींचे कर्ज? ठगबाजांचा अखेर असा भरला घडा...

मनोज खुटाटे

जलालखेडा (जि.नागपूर) :  तर एकंदर प्रकरण असे आहे. जिल्ह्यातील नरखेड तालुक्‍यातील सिंजर गावातील शेतकऱ्यांच्या नावाने प्रत्येकी पन्नास ते साठ लाखांचे परस्पर कर्ज काढल्याचे प्रकरण दोन वर्षांपूर्वी पुढे आले होते. ज्या शेतकऱ्यांच्या नावाने कर्ज काढून त्यांची फसवणूक केली गेली आहे, त्यापैकी अनेक शेतकरी भूमिहीन असल्याची धक्कादायक बाबसमोर आली होती. कर्जाची ही रक्कम जवळपास शंभर कोटींच्यावर असल्याचे बोलले जात होते. "कार्पोरेशन बॅंक' या राष्ट्रीयकृत बॅंकेतून हे कर्ज काढण्यात आले होते. कार्पोरेशन बॅंकेच्या वकीलाकडून नरखेड तालुक्‍यातील सिंजर गावातील शेतकऱ्यांना कर्जवसुलीच्या नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. तेव्हा कुठे या शेतकऱ्यांना त्यांच्या नावाने कोणी तरी कर्ज काढल्याचे कळले होते. हे ऐकूण त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली.

अधिक वाचा : गोगलगाय पोटात पाय, झाडावर चढते अन्‌ करते काय? वाचाच...

बॅंकेने कसे काय दिले कर्ज?
नरखेड तालुक्‍यातील सिंजर ग्रामपंचायतचा नरेगाचा रोजगारसेवक असलेल्या निलेश ढोपरे याने सिंजरमधील शेतकऱ्यांकडून जॉब कार्डासाठी आधारकार्ड आणि इतर कागदपत्रे गोळा केली होती. याच कागदपत्रांच्या आधारावर कर्ज उचलण्यात आले असल्याचा आरोप पिडीतांनी केला होता. कर्जाची रक्कम जवळपास शंभर कोटींच्यावर असल्याचे बोलले जात होते. ज्यांच्याजवळ शेती नाही किंवा आहे तरी ती पाच एकर पेक्षा जास्त नाही. अशा लोकांजवळ लाखो रुपयांचा शेतमाल आला कुठून? बॅंकेने कर्ज दिले कसे? बॅंकेने कर्जाची रक्कम कोणाला दिली? यात बॅंक अधिकारी तर समाविष्ट तर नाही ना? या प्रकरणात बॅंकेवरसुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.

अधिक वाचा  : कां आणि कशासाठी होमक्‍वारंटाईन होण्याची वेळ आली आमदार समीर मेघेंवर, वाचाच...

अशी झाली कार्यवाही
यातील पिडीतांनी जलालखेडा पोलित ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिस ठाण्यातील डायरीला नोंद करण्यात आली होती. पण त्यावेळी कोणावर ही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. शेवटी हे प्रकरण ग्रामीण पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले होते व त्यांनी याची चौकशी करून गुन्हे दाखल केले होते. न्यायालयाच्या आदेशानंतर ग्रामीण पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे तपास सोपविण्यात आला होता. आर्थिक गुन्हे शाखा आणि स्थानिक गुन्हे शाखेने आरोपी राकेश उपेंद्र सिंह, नूतन राकेश सिंह (रा. बोखारा कोरडी) व निलेश शेषराव ढोपरे (रा. सिंजर, ता. नरखेड) यांना शुक्रवारी (ता.24) अटक करण्यात आली असून त्यांची 30जुलैपर्यंत पोलिस कोठडी घेण्यात आली आहे. राकेश सिंह हा मध्यप्रदेशच्या एका कांग्रेसी नेत्याचा नातेवाईक असल्यामुळे तो आतापर्यंत अटक होण्यापासून वाचत होता. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले व आरोपींना अटक करण्यात आली.

अधिक वाचा : तब्बल पाच तास होते कोविड रूग्ण ताटकळत, काय आहे भानगड...

बॅंकेचे अधिकारी अद्याप रडारच्या बाहेर
विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर आरोपी राकेश सिंह याने कार्पोरेशन बॅंकेच्या काही अधिका-यांना हाताशी घरून शेतमालावर शेतकऱ्यांच्या खात्यांवर कोटयवधी रुपयांचे कर्ज उचलले होते. आरोपी राकेश सिंह यांना कर्ज मिळून देणाऱ्या अधिकाऱ्यांचा पोलिस शोध घेत आहेत. पण ते अद्यापही पोलिसांच्या रडारच्या बाहेर आहे.

बॅंकेचे दोन अधिकारी यांच्यावरही गुन्हा
जेव्हा रिझर्व बॅंकेचा "ऑडिट रिपोर्ट' आला, त्याच दिवशी म्हणजे शुक्रवारी तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली. यात कार्पोरेशन बॅंकेचे दोन अधिकारी यांच्यावरही गुन्हा दाखल असून त्यांचा शोध सुरु आहे. त्यांना लवकरच अटक करण्यात येईल.
सुधाकर अंभोरे
प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी
आर्थिक गुन्हे शाखा, नागपूर ग्रामीण

संपादन  :  विजयकुमार राऊत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Will MS Dhoni Play IPL 2027? महेंद्रसिंग धोनी पुढच्या वर्षी पिवळ्या जर्सीत दिसेल का? ऋतुराज गायकवाडचं उत्तर, नेमकं काय म्हणाला?

IPL 2026 Playoff Scenario : चेन्नईचे आव्हान संपुष्टात! गुजरातची Qualifier 1 साठी दावेदारी; आता एका जागेसाठी चार संघांमध्ये स्पर्धा

Abhijeet Dipke: दिल्लीत पोहोचताच पोलीस तिहार जेलमध्ये टाकतील... ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपकेंना भीती सतावतेय

Congress politics : ‘कॉक्रोच जनता पक्ष’ हा असंतोषाचा इशारा; काँग्रेसला नव्याने उभारी देण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन

NEET Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरचे बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे सीबीआय ताब्यात; मुलासाठी प्रश्नपत्रिका खरेदीचा आरोप

SCROLL FOR NEXT