file photo
file photo 
नागपूर

तांत्रिक पेचामुळे राहणार शेकडो जागा रिक्त

मंगेश गोमासे

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदवी प्रवेशासाठी 30 सप्टेंबर अंतिम तारीख आहे. यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार नसल्यामुळे अभियांत्रिकीसाठी प्रवेश घेतल्याने रिक्त होणाऱ्या जागांवर कुठल्याही महाविद्यालयाला प्रवेश घेता येणार नसल्याने शेकडोंच्या संख्येत जागा रिक्त राहणार आहे.

दरवर्षी बारावीचा निकाल मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लागतो. त्यामुळे साधारणतः जून महिन्यात अभियांत्रिकीसह इतर अभ्यासक्रमातील प्रथम वर्षाचे प्रवेश सुरू होतात. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रक्रिया समाप्त होत असते. यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निकाल जुलैमध्ये लागला. मात्र, अद्याप अभियांत्रिकीसह व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली नाही.

ती सुरू होताच नामवंत महाविद्यालयात टक्केवारीच्या आधारे प्रवेश मिळविणारे बरेच विद्यार्थी प्रवेश रद्द करून व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेतील. त्यामुळे या जागा रिक्त होण्याची शक्यता आहे. विद्यापीठाची प्रवेशाची तारीख निघून गेल्याने या जागा रिक्तच राहतील. यामुळे महाविद्यालयांना आर्थिक फटका बसणार असून विद्यार्थ्यांनाही प्रवेशापासून वंचित राहावे लागणार आहे. बऱ्याच महाविद्यालयात रिक्त जागा असताना यात तांत्रिक पेचामुळे रिक्त जागांमध्ये वाढ होण्याची भीती आहे.

प्रक्रियेला मुदतवाढ द्या
अभियांत्रिकीसह इतर व्यावसायिक अभ्यासक्रमातील प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यावर बऱ्याच जागा रिक्त होणार आहेत. या जागांवर अन्य विद्यार्थ्यांना प्रवेश मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ देत या जागांवर प्रवेश देण्याची गरज असल्याचे धनवटे नॅशनल काॅलेजचे प्राचार्य  डॉ. सुरेंद्र जिचकार यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha: "विशाल पाटलांवर शिवसेनेचा अन्याय"; भाजपचे केंद्रीय मंत्री काय बोलून गेले...

Health Care : भरपूर खाऊनदेखील भूक लागते? असू शकते गंभीर आजाराचे लक्षण

CSK vs SRH : बाळ येतंय, मॅच लवकर संपव...! SRH विरुद्धच्या सामन्यादरम्यान साक्षीने धोनीला का केली स्पेशल रिक्वेस्ट?

Raghuram Rajan: संपत्ती वितरणाबाबत रघुराम राजन यांचे वक्तव्य चर्चेत; म्हणाले, ''श्रीमंतांवर कर...''

KKR vs DC : कोलकत्याच्या मार्गात दिल्लीचा अडथळा! सुनील नारायणचा पुन्हा दिसणार ‘वन मॅन शो’.... की जेक फ्रेसर मॅर्कगर्क घालणार तांडव

SCROLL FOR NEXT