Husband committed suicide in Nagpur 
नागपूर

लग्नाच्या काही महिन्यातच लागली दारू पिण्याची सवय, पत्नीला फोन करून म्हणाला...

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : माहेरी राहत असलेल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. सचिन गोवर्धन वर (वय 36, रा. महाजनवाडी, प्रभाग क्र. 10 एमआयडीसी) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन वर हा खाजगी वाहन चालक होता. 2015 मध्ये सचिनचा हिंगणा तालुक्‍यातील उखडी गावात राहणाऱ्या सलोनी (वय 26) हिच्याशी लग्न झाले होते. त्यांना दोन वर्षांची मुलगी आहे. लग्नाच्या काही महिन्यानंतरच सचिनला दारू पिण्याची सवय लागली होती. याच कारणावरून घरात वाद होत होते. 

मार्च महिन्यापासून सचिन हा पत्नी सलोनीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. "कुण्यातरी युवकासोबत तुझे प्रेम संबंध आहेत' असा आरोप करीत होता. याच कारणावरून वाद घालत पत्नीला मारहाणही करीत होता. मारहाणीला कंटाळून पत्नी मार्च महिन्यात माहेरी निघून गेली. त्याने अनेकदा फोन करून पत्नीला परत बोलावले, परंतु पत्नीने परत येण्यास नकार दिला. 

या कारणामुळे तो गेल्या तीन दिवसांपासून नैराश्‍यात होता. सचिनने शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास घरात सिलिंग फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास सुरू केला आहे. 

आत्महत्येपूर्वी पत्नीला फोन

शुक्रवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास सचिनने पत्नी सलोनीला फोन केला. तिला घरी परत येण्याबाबत विनवणी केली. परंतु, तिने नकार देताच त्याने घराची चावी आणि एटीएम कार्ड वहिनीकडे ठेवलेले असल्याचे सांगितले आणि फोन कट केला. त्यानंतर सिलिंग फॅनला गळफास लावून आत्महत्या केली, अशी माहिती पोलिसांनी दिली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT