Nagpur Crime esakal
नागपूर

Nagpur Crime : चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीच्या डोक्यात वार करत पतीकडून हत्या; एका मित्रासोबत पत्नीला पाहिलं अन्..

मन्नत आणि दिलप्रित यांचे २०२२ ला लग्न झाले. दिलप्रित याचे स्पेअर पार्टचे दुकान आहे.

सकाळ डिजिटल टीम

याप्रकरणी विशालच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करीत, दिलप्रितचा शोध सुरू केला. दरम्यान, त्याला पोलिसांनी नवीन कामठी परिसरातून ताब्यात घेतले.

नागपूर : पत्नीच्या चारित्र्यावर शंका घेत, तिच्या डोक्यावर वार करीत खून केल्याची घटना कपिलनगर पोलिस ठाण्याच्या (Kapil Nagar Police Station) हद्दीत असलेल्या दीक्षित नगरतील (Dixit Nagar) पंचमवैद्य आर्य सोसायटीत मंगळवारी (ता. २५) रात्री साडेनऊच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीस अटक केली.

मन्नत ऊर्फ मिनू कौर विर्क (वय २४) असे पत्नीचे नाव असून दिलप्रित उर्फ विक्की कुलविंदरसिंग विर्क (वय ३०) असे अटक करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मन्नत आणि दिलप्रित यांचे २०२२ ला लग्न झाले. दिलप्रित याचे स्पेअर पार्टचे दुकान आहे. त्याने तिला सदर येथे एका मित्रासोबत पाहिले होते. तेव्हापासून तो सातत्याने तिच्या चारित्र्यावर शंका घेत होता.

विशेष म्हणजे, त्याने मन्नतचा भाऊ विशाल प्रकाश हरजानी (वय २०, हुडको कॉलोनी, जरीपटका) याला तिला सोडचिठ्ठी देण्याबाबत बैठकीला बोलाविले होते. दरम्यान, विशालने मन्नत आणि दिलप्रित यांना फोन केला. मात्र, दोघांनीही फोन न उचलल्याने त्याला शंका आली. त्याने पोलिसांना याबाबत सूचना देत, घर गाठले.

मात्र, दाराला लॉक असल्याने त्यांनी दार तोडून आत प्रवेश केला असता, मन्नतच्या डोक्यावर प्रहार केल्याने ती रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसून आली. पोलिसांनी तिला उपचारासाठी मेयो रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. याप्रकरणी विशालच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करीत, दिलप्रितचा शोध सुरू केला. दरम्यान, त्याला पोलिसांनी नवीन कामठी परिसरातून ताब्यात घेतले. त्याने खुनाची कबुली दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs DC Live: दिल्ली कॅपिटल्सचा दबदबा, रिषभ पंतच्या संघाची निघाली हवा; अक्षर पटेलच्या नेतृत्त्वाची जबदरस्त झलक, समोर माफक लक्ष्य

Donald Trump: ''आम्ही इराणवरचे हल्ले थांबवू शकतो, पण इस्रायल...'', डोनाल्ड ट्रम्प माघार घेण्याच्या तयारीत, उद्या काय बोलणार?

Thane News: ठाण्यात नेमकं चाललंय काय! २ अल्पवयीन मुली बेपत्ता, अज्ञातांनी फूस लावून अपहरण केल्याचा संशय; गुन्हे दाखल

Latest Marathi News Live Update : हडपसर-मांजरी-मगरपट्टा-महंमदवाडी परिसरात दीड तास पाऊस

Mhada House: म्हाडाच्या घरासाठी मुंबईकरांची झुंबड, दोन दिवसांत ३,३६२ अर्ज, निकाल कधी लागणार?

SCROLL FOR NEXT