husband killed his wife on suspicion of having immoral love relationship police crime nagpur Sakal
नागपूर

Nagpur Crime News : अनैतिक संबंधाच्या संशयावरून पतीने केला पत्नीचा खून

अनैतिक संबंधाच्या संशयावरून ६५ वर्षीय पतीने पत्नीच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार करून खून केला.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : अनैतिक संबंधाच्या संशयावरून ६५ वर्षीय पतीने पत्नीच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार करून खून केला. ही घटना कोराडीतील सुरादेवी परिसरात बुधवारी (ता.८) सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास उघडकीस आली. इंदिरा गिरिधर भारद्वाज (वय ५५, रा. सुरादेवी, कोराडी) हे मृत पत्नीचे नाव असून गिरिधर मोतीराम भारद्वाज असे आरोपी पतीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही वर्षांपूर्वी शेतीवाडी विकून त्यातून आलेल्या पैशातून गिरिधर याने घर बांधले. मात्र, त्यानंतर ते पत्नीसह घरच्यांशी सातत्याने भांडण करायचे. माझे घर असून येथून सर्वांना हाकलून देईल, असे नेहमी म्हणून पत्नी आणि मुलांना मारहाण करीत होता. त्यामुळे मुले आणि पत्नीने त्यांच्याकडे लक्ष देणे सोडले होते.

आज सकाळी देवेंद्र दुकानात बसला होता. त्याच्यासोबत मित्रही होता. गिरिधर आणि त्याची पत्नी हे दोघेही हॉलमध्ये बसले. यावेळी गिरिधर याने पत्नीशी भांडण सुरू केले. याशिवाय मुलगा देवेंद्र आणि पत्नीला शिवीगाळ करून ‘माझ्या घरी राहू नका निघून जा’ असे म्हटले.

दरम्यान त्याने पत्नीला मुलाशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप केला. या प्रकारामुळे पत्नी इंदिरा संतापली. तिनेही त्याच्याशी वाद घातला. यावर गिरिधर याने तिला मारून टाकण्याची धमकी दिली.

मात्र, पत्नीने त्याला घाबरत नसल्याचे म्हणताच, त्याने बाहेरून कुऱ्हाड आणून पत्नीच्या डोक्यावर मारली. त्यामुळे पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडून तिचा मृत्यू झाला. मात्र, तिला वाचविण्यासाठी देवेंद्रचा मित्र गेला असता, त्यालाही मारण्यास गिरिधर धावला. मात्र, तो पळू लागला. इतक्यात देवेंद्र आणि त्याच्या पत्नीने आईला उचलून खासगी दवाखान्यात दाखल केले.

डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. त्यानंतर पोलिसांना दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करीत गिरिधर याला अटक केली. गिरिधर याला चार मुले असून तीन मुले आणि एक मुलगी आहे. त्यापैकी दोन मुलांचे आणि मुलीचे लग्न झाले आहेत. एक मुलगा अविवाहित आहे. यापैकी देवेंद्र नावाच्या मुलाचे घरीच किराणा दुकान आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cruise Incident: बर्गी धरणात मोठा अपघात! ४० प्रवाशांना घेऊन जाणारे जहाज बुडाले; ४ जणांचे मृतदेह सापडले, अनेक जण बेपत्ता

RTE Admission Deadline Extended: आरटीई २५ टक्के राखीव प्रवेशांसाठी अंतिम मुदतवाढ; पालकांना ८ मे पर्यंत संधी

Maharashtra Private School Fee Refund: खासगी शाळांना शुल्क परतावा धोरणाच्या दिशेने एक पाऊल; प्राथमिक शिक्षण संचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन

सोलापूरच्या पोलिस दलातील ‘या’ १५ अधिकारी-अंमलदारांना महासंचालकांचे सन्मानचिन्ह! महाराष्ट्र दिनानिमित्त आज पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार गौरव, वाचा...

Raj Thackeray Pune Speech : आग्र्याहून सुटका ते अफजल खान वध; शिवरायांच्या पराक्रमातून काय शिकावे? राज ठाकरेंनी मांडले स्पष्ट मत

SCROLL FOR NEXT