चार महिन्यांपूर्वी झालेल्या प्रेमविवाहाचा अंत Sakal
नागपूर

Nagpur Crime News : संशयावरून खून करणाऱ्या पतीस जन्मठेप; चार महिन्यांपूर्वी झालेल्या प्रेमविवाहाचा अंत

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीस सत्र न्यायालयाने सश्रम जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच, २५ हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास तीन महिन्यांच्या अतिरिक्त सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीस सत्र न्यायालयाने सश्रम जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच, २५ हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास तीन महिन्यांच्या अतिरिक्त सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. ललित समेलाल मारकंडे (वय २८, रा. मुराबर्डी, ता. खैरागड, जि. राजनंदगाव, छत्तीसगड) असे दोषीचे नाव आहे.

ललित विरोधात पत्नी ज्योतीचा खून केल्याच्या आरोपात पारडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद आहे. सत्र न्यायाधीश दिनेश सुराणा यांनी हा निर्णय दिला. ही घटना १५ फेब्रुवारी २०२१ च्या मध्यरात्री घडली. ललित २०१८ मध्ये कामाच्या शोधात तक्रारदार असलेले चुलत जावई भीखम दुरदे टंडन यांच्याकडे आला.

ते कापसीतील एमआयडीसी येथील आरामशीनमध्ये काम करायचे आणि तेथेच राहायचे. चुलत मेव्हण्याला मदत म्हणून भीखम यांनी ललितला एमआयडीसीतील बिडाच्या वस्तू तयार करणाऱ्या फॅक्ट्रीत काम मिळवून दिले.

तर, भीखम यांच्या आई-वडिलांचे राहणे भांडेवाडी परिसरात होते. त्याच परिसरामध्ये राहण्याऱ्या ज्योतीची ललितशी ओळख झाली. त्यामुळे, ललितचे भांडेवाडीमध्ये येणे जाणे वाढले. ललितने ज्योतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले.

घटनेच्या चार महिन्यापूर्वी, १७ ऑक्टोबर २०२० रोजी रितीरीवाजानुसार भीखम यांनी ललित आणि ज्योतीचे लग्न लावून दिले. १५ फेब्रुवारी २०२१ रोजी मध्यरात्री ललितने आरामशीनमधील लाकडी ओंडक्याने ज्योतीवर वार करून तिचा खून केला. दुसऱ्या दिवशी सकाळी भीखम यांचा मुलगा ललितकडे गेल्यावर ही ज्याती जखमी दिसली.

ललित बेपत्ता होता. भीखम यांनी फोन करून जाब विचारल्यानंतर त्याने घडलेला प्रकार सांगितला. त्यामुळे, भीखम यांनी पारडी पोलिस ठाण्यात तक्रार केली. न्यायालयाने २४ साक्षीदारांची साक्ष लक्षात घेत ललितला दोषी ठरविले. राज्य शासनातर्फे ॲड. आसावरी पळसोदकर यांनी बाजू मांडली.

दहा दिवसांपूर्वीच परतली होती माहेरून

लग्नानंतर तीन महिन्यामध्येच ललितने ज्योतीच्या चारित्र्यावर संशय घेणे सुरू केले. १ फेब्रुवारी २०२१ च्यादरम्यान ललितने पुन्हा ज्योतीवर संशय घेत लाथाबुक्यांनी तिला मारहाण केली होती. त्यावेळी एका आठवड्यांसाठी ती माहेरी परतली होती. मात्र, माहेरच्यांनी तिची समजूत काढून तिला पुन्हा ललितकडे पाठविले. त्यानंतर दहा दिवसांमध्येच, १५ फेब्रुवारी २०२१ रोजी मध्यरात्री ललितने तिचा खून केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : आषाढी वारीत दुर्दैवी घटना! जेजुरीजवळ ट्रकची वारकऱ्यांना धडक, ३ महिलांचा मृत्यू, ४ गंभीर जखमी

Ashadhi Wari: पंढरपुरात सायकलवारीचा जल्लोष! महाराष्ट्र-कर्नाटकातील ४ हजार सायकलस्वारांची हरिनामाच्या गजरात नगरप्रदक्षिणा

Nagpur: विक्रेत्याच्या चुकीची शिक्षा आता खरेदीदाराला नाही; जीएसटीच्या नियमांमध्ये होणार बदल

Latest Marathi News Live Update : जेजुरीजवळ ट्रकच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी रुग्णालयात जाऊन जखमींची केली विचारपूस

Petrol-Diesel Price Today: अमेरिका-इराण संघर्षानंतर देशात इंधनाचे नवे दर जाहीर! 13 जुलैला पेट्रोल-डिझेल किती रुपयांना?

SCROLL FOR NEXT