Mahashivratri 2023 esakal
नागपूर

Nagpur : मले लागले तुझे ध्‍यास गा महादेवा... भोळ्या शंकरा

महाशिवरात्री महोत्सवासाठी सजली शिवमंदिरे, गुंजणार बम बम भोलेचा गजर

शरद सहारे

नागपूर : गणेशोत्सव आणि नवरात्र महोत्सवानंतर महत्त्व असलेल्या महाशिवरात्री महोत्सवासाठी शिवमंदिरे सजली आहेत. नंदीवर स्वार असलेल्या भोळ्या शंकराच्या दर्शनासाठी त्याचे गण आतुर झाले आहेत. महाशिवरात्रीचा महोत्सव म्हणजे भाविकांसाठी पर्वणीच होय. नागपूर जिल्‍ह्यातील आंभोरा, कपिलेश्वर, नगरधन, महानागबळेश्वर, रामधाम, महादेव घाट, अंबाखोरी येथील शिवमंदिर महाशिवरात्री महोत्सवासाठी सजली आहेत.

वैनगंगा, कन्हान, आम, मुर्झा आणि कोलार या पाच नद्यांच्या संगमावर आणि निसर्गाच्या कुशीत वसलेल्या श्री चैतन्यश्वेर महादेवाच्या मंदिरात महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते. नागपूरवरुन पाचगाव, डोंगरगाव, कुही, मांढळ, पचखेडी, वेलतूर मार्गे ८० किमी आणि भंडाऱ्यावरून १८ किमी अंतरावर कुही तालुक्याच्या शेवटच्या टोकावर आंभोऱ्याचे देवालय आहे. नागपूर-भंडारा जिल्ह्याच्या सीमेवरील वैनगंगा नदीवर केबल पूल बांधल्याने यावर्षी भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.

स्वामी हरीहरनाथ यांनी या ठिकाणी बारा वर्षे पशुपतव्रत करून मोठा यज्ञ केला, अशी माहिती विवेकसिंधू ग्रंथात आहे. याच यज्ञातून शिवशंकर महाप्रभू चैतन्यश्वेर रूपाने प्रगटले होते, अशी आख्यायिका आहे. या तीर्थक्षेत्राला सरासरी ९०० वर्षापूर्वी ‘अंभ’ म्हटले जात असे. मराठीचा आद्यग्रंथ विवेकसिंधुची रचना याच ठिकाणी शके १११० (इ.स. ११८८) ला मुकुंदराज स्वामींनी हरीहरनाथांच्या समाधीसमोर केली. पर्वतावर देखना कोल्हासूर तर बाजूलाच प्राचीन बौद्ध विहार आहे.

India reaction to Sheikh Hasina death sentence : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या फाशीच्या शिक्षेवर भारताची पहिली प्रतिक्रिया!

Kagal Nagarparishad Election : हसन मुश्रीफ-समरजित घाटगे एकत्र; कागल नगरपरिषद बिनविरोध करण्याचा संकल्प

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अर्ज भरायला जाताना ‘या’ उमेदवारास १०० पोलिसांचा बंदोबस्त; पहाटे ५.३० वाजता उमेदवार नगरपंचायतीत, अनगरची बिनविरोधाची ६५ वर्षांची परंपरा खंडीत

Ladki Bahin Yojana eKYC Deadline Extension: मोठी बातमी! लाडक्या बहिणींना सरकारकडून दिलासा; अखेर eKYC साठी जाहीर केली मुदतवाढ

Crime: सासरा आणि सूनेचं प्रेम जडलं; अडसर ठरणाऱ्या मुलाचा काटा काढला, मात्र एका चुकीनं बाप पोलिसांच्या जाळ्यात अडकला

SCROLL FOR NEXT