file photo 
नागपूर

आदर्श शिक्षक पुरस्कार’वरून माहिला पदाधिकाऱ्यांमधील शीतयुद्ध पेटणार!

नीलेश डोये

नागपूर  : आदर्श पुरस्कारासाठी झालेल्या निवडीवरून शिक्षकांमध्ये नाराजी असून यात मोठे अर्थकारण झाल्याची चर्चा आहे. यातच विभागीय चौकशी सुरू असलेल्या शिक्षकाची निवड करण्यावरून जिल्हा परिषदेची चांगलीच किरकिरी होत आहे. पक्षश्रेष्ठीने धारेवर धरल्याने पदाधिकाऱ्यांकडून एक दुसऱ्याकडे बोट दाखविण्यात येत आहे. विशेष म्हणजे या निवड समितीमध्ये सर्व महिला पदाधिकारी होत्या. त्यांच्यात सुरू असलेले शीतयुद्ध पेटणार असल्याची चर्चा जिल्हा परिषदच्या रंगली आहे.

जिल्हा परिषदेत चार महिला पदाधिकारी आहेत. काही प्रकरणावरून मतभेद निर्माण झाल्याने त्यांच्यात दोन गट पडले असल्याची चर्चा आहे. एकाप्रकरणात तर पुरूष पदाधिकाऱ्याला हस्तक्षेप करावा लागला होता. सहा-आठ महिन्याच्या काळातच पदाधिकाऱ्यांनामध्ये कुरघोडीचे राजकारण सुरू झाल्याने अधिकाऱ्यांनकडूनही आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. पुरस्काराकरता शिक्षकाची निवड सामजस्याने झाल्याचे दर्शविण्यात आले.

याची पटकथा आधीच तयार करण्यात आल्याचे सांगण्यात येते. पदाधिकारी आणि काही सदस्यांनी मिळून नावे निश्चित केल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते. मात्र काही नावावरून त्यांच्यात एक वाक्यता नव्हती. त्यामुळेच आदर्श शिक्षकाच्या नावाची घोषणा करताना अध्यक्षा रश्मी बर्वे यांना टाळण्यात आल्याची चर्चा आहे. शिक्षकांची नावे शिक्षण सभापती भारती पाटील यांनी जाहीर केली. यावेळी महिला बाल कल्याण सभापती उज्ज्वला बोढारे आणि समाजकल्याण सभापती नेमावली माटे उपस्थित होत्या. परंतु अध्यक्षा बर्वे नसल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. विशेष म्हणजे अध्यक्षा बर्वेच निवड समितीचे अध्यक्ष आहेत.

आदर्श शिक्षकाकरता एका विभागीय चौकशी सुरू असलेल्या शिक्षकाची निवड झाल्याचे समोर येताच जि.प.ची चांगलीच किरकिरी झाली. त्यामुळे संबंधित शिक्षकाचा पुरस्कार थांबविण्याची वेळ आली. प्रकरण अंगलट येत असल्याने निवड समितीतील महिला पदाधिकारी याकरता एक दसऱ्याला जबाबदार ठरवत असल्याची माहिती आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: एलपीजी गॅसला पर्याय सापडलेलं डायमिथाईल इथर नेमकं काय आहे? पुण्यातल्या शास्त्रज्ञांच्या हाती मोठं यश

CA Exam : टेलर व्यावसायिकाचा मुलगा झाला ‘सीए’; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवले यश

Beed Crime: अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार करुन खांबाला बांधलं; लोकांनी सोडवण्याऐवजी व्हिडीओ शूट केले

Nasrapur Accident : भरधाव डंपरने दुचाकीला मागून ठोकरले; अपघातात आजोबा, नातीचा मृत्यू

Prakash Ambedkar : एपस्टिन प्रकरणाबाबत संघाला जाब विचारणार; २३ मार्चला नागपुरात आंदोलन

SCROLL FOR NEXT