nagpur sakal
नागपूर

Nagpur : अवैध कोळसा डम्पिंग यार्डचे जाळे

कामठी तालुक्यात परवानगीशिवाय कोळशाचा व्यापार सुरू

सकाळ वृत्तसेवा

कामठी : परिसरातील विना परवाना अवैध कोळसा डम्पिंग यार्डधारकावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसच्या वतीने जि.प.सदस्य दिनेश ढोले यांच्या नेतृत्वात मौद्याचे उपविभागीय अधिकारी व जिल्हा ग्रामीण पोलिस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले.

तालुक्यातील कापसी(बु), कापसी(खु), महालगाव, आसोली, गुंमथाळा, भोवरी, कढोली, दिघोरी, नेरी, गादा, लिहीगाव, सावळी परिसरात विना परवाना अवैधरीत्या कोळसा डम्पिंग यार्ड टालधारकाने ग्रामपंचायत, प्रदूषण नियंत्रण मंडळ व कोणत्याही प्रकारची शासकीय परवानगी न देता कोळसा डम्पिंग यार्ड सुरू केल्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषणाचा प्रश्न निर्माण झाला. विशेष म्हणजे ग्रामपंचायतकडूनसुद्धा कुठल्याही प्रकारची परवानगी घेतलेली नसल्याचे आढळून आले आहे. या परिसरातील नागरिक विविध साथीच्या रोगामुळे त्रस्त आहेत.

सोबतच अवैध कोळसा टालमुळे मोठ्या प्रमाणात अवैध धंदे या परिसरात सुरू झाले आहेत. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कोळसा व इतर साहित्याची मोठ्या प्रमाणात जड वाहतूक होत असल्यामुळे ग्रामीण भागातील डांबर रोड फुटून ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघात झाले आहेत. अपघातात अनेकांना प्राणसुद्धा गमवावे लागले आहेत.

अनेकांना अपंगत्वही आले आहे. त्यामुळे त्यांचे परिवार उघड्यावर पडले आहेत. विनापरवाना अवैधरीत्या सुरू असलेले कोळसा डम्पिंग यार्ड टाल शासनाच्या वतीने त्वरित योग्य चौकशी करून कारवाई न केल्यास काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात दिला आहे. तालुक्यातील व परिसरातील विना परवाना अवैध कोळसा डम्पिंग यार्ड धारकांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसच्या वतीने जि.प.सदस्य दिनेश ढोले यांच्या नेतृत्वात मौद्याचे उपविभागीय अधिकारी व जिल्हा ग्रामीण पोलिस अधीक्षकांना निवेदन देताना काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश महासचिव अनुराग भोयर, जि.प.सदस्य दिनेश ढोले, कृषी सभापती तापेश्वर वैद्य, जि.प.सदस्य योगेश देशमुख, कापसी (खु)चे सरपंच सूरज पाटील, उपसरपंच अक्षय रामटेके, रुपेश शेंद्रे, आकाश बाराहाते, अमोल निधान, विशाल शेंद्रे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sidharth Malhotra's Father Passes Away : सिद्धार्थ मल्होत्राच्या वडिलांचे निधन!, भावूक होत केली पोस्ट अन् म्हणाला...

Bhigwan Crime : आई अन् भावाच्या डोळ्यांत मिरची पूड टाकून तरुणीचे दोघांकडून अपहरण

Car Accident : भरधाव मोटारीच्या धडकेत बालकाचा मृत्यू; तिघे जण गंभीर जखमी

Pune Traffic: गुरुवारी पुणे शहरातील वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद? कोणते रस्ते सुरु? वाचा सविस्तर

पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी एका पदासाठी १० उमेदवार! सोलापूर शहर-ग्रामीण पोलिसांच्या १६९ पदांसाठी ३१६६ जण ‘मैदानी’त पास, वाचा...

SCROLL FOR NEXT