Corona Vaccine sakal
नागपूर

नागपूर : चार दिवसांत २५ टक्क्यांवर विद्यार्थी झाले लसवंत

१९ केंद्रांवर उत्स्फूर्त प्रतिसाद ; नोंदणीसाठी उत्साह

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : शहरात १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी लसीकरण(students vaccination) सुरू होऊन चार दिवस झाले असून ३५ हजारांवर तरुणांनी लसीचा पहिला डोस घेतला. लसीकरणासाठी पात्र एकूण विद्यार्थ्यांपैकी २७.५ टक्के विद्यार्थ्यांनी लस घेतली. एकूणच तरुणाईमध्ये लसीकरणाबाबत उत्साह दिसून येत आहे. दररोज दहा हजारांवर विद्यार्थी ऑनलाइन नोंदणी करीत आहेत. केंद्र सरकारने(central government) १०० टक्के लसीकरणावर भर दिला असून १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्याच्या सूचना केल्या आहे. त्यानुसार नागपुरात ३ जानेवारीपासून या वयोगटासाठी लसीकरण सुरू करण्यात आले.

पहिल्याच दिवशी ६ हजार ८३८ विद्यार्थ्यांनी लसीकरण करीत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विद्यार्थ्यांचा हा प्रतिसाद कायम असून दररोज लसवंत विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. पहिल्या दिवशी दहा हजारांवर विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली होती. पहिल्या दिवशी १९ केंद्र व ३३ शाळांमधून लसीकरण करण्यात आले. गेल्या चार दिवसांत ३५ हजार ७३२ विद्यार्थ्यांचे लसीकरण झाले. शहरात एकूण १ लाख ३० हजार विद्यार्थी लसीकरणासाठी पात्र आहे. अर्थात चार दिवसांत २७.५० टक्के विद्यार्थ्यांनी लस घेतल्याचे दिसून आले. सर्दी, खोकला असलेल्या विद्यार्थ्यांना परत पाठविण्यात येत आहे. अन्यथा ही टक्केवारी आणखी वाढली असती, असे महापालिकेतील अधिकाऱ्यांनी नमुद केले. लसीकरणासाठी ऑनलाइन किंवा ऑफलाइन नोंदणी बंधनकारक आहे. शैक्षणिक संस्थांमधील केंद्रांवर ऑनलाइन नोंदणीची गरज नाही.

१५ जानेवारीपर्यंत ‘डेडलाइन’

शहरात १ लाख ३० हजार विद्यार्थी लसीकरणासाठी पात्र आहे. लसीकरणाचा वेग बघता येत्या चार ते पाच दिवसांत पात्र सर्व विद्यार्थी लसवंत होतील. परंतु १५ जानेवारीपर्यंत सर्व विद्यार्थ्यांचे लसीकरणाचे लक्ष्य महापालिकेने ठेवले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Price Prediction : सोने १ लाख २५ हजारांवर पोहोचणार?, जून महिन्यात ८.२८ टक्क्यांनी दरात घसरण; तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज

Latest Marathi News Update : पल्स पोलिओ लसीकरणाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते

Success Story: दिवसा मोलमजुरी, पहाटे घाटरस्त्यावर धावण्याचा सराव; विकास काळेची प्रेरणादायी पोलिस भरारी, घर नाही, क्लास नाही... पण जिद्द होती..

Mhada Lottey : म्हाडाची लॉटरी रखडली, सोडत लांबल्याने अर्जदारांची आर्थिक ओढाताण

Pune: उरुळी कांचन येथे "कृषि विभागाच्या विविध योजनांबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन मेळावा

SCROLL FOR NEXT