Income Tax Department raids 17 places nagpur Confiscation of suspect documents esakal
नागपूर

Nagpur : प्राप्तिकर विभागाचे शहरात १७ ठिकाणी छापे; संशयित कागदपत्रे जप्त

मुंबईच्या अधिकाऱ्यांनी केली कारवाई

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कर चुकवेगिरी करणाऱ्यांसह हवाला व डब्बा व्यवसायातील शहरातील नऊ व्यावसायिकांचे निवासस्थान आणि कार्यालयासह २० ठिकाणांवर प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज सकाळी एकाचवेळी छापे टाकले. या धाडसत्रामुळे शहरातील व्यावसायिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दिलेल्या माहितीच्या आधारे कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे.

मुंबईहून आलेल्या जवळपास १५० हून अधिक प्राप्तिकर अधिकाऱ्यांनीच शहरात १७ आणि इतर शहरात तीन ठिकाणी एकाचवेळी छापे टाकले. विशेष म्हणजे या छाप्याची माहिती नागपूर प्राप्तिकर विभागाला देण्यात आली नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे स्थानिक अधिकारी आणि कर्मचारी यात सहभागी नव्हते.

कारवाईसाठी पोलिसांसह सीआरपीएफ जवानांची मदत घेण्यात आली. डब्बा व्यावसायिकांमध्ये रवी अग्रवाल आणि हवाला व्यावसायिक शैलेश लखोटिया, पारस जैन, करण थावरानी, गोपी मालू, हेमंत तन्ना, इजराईल सेठ आणि सीए रवी वानखेडे यांच्यासह काही व्‍यावसायिकांवर धाडी टाकण्यात आल्या. ईडीने दिलेल्या माहितीच्या आधारे हे छापे टाकण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

रवी अग्रवाल यांचा व्यवसाय नागपूरसह मुंबईतही पसरला आहे. त्यांचा ‘छतरपूर फार्म’ नावाजलेला आहे. त्यांची एल-७ कंपनी डब्बा व्यवसायात २००७ ते २०१५ पर्यंत कार्यरत होती. २०१५ मध्ये सर्वप्रथम डब्बा व्यवसाय घोटाळ्यात त्यांचे नाव पुढे आले होते. त्यावेळी पोलिस उपायुक्त दीपाली मासिरकर यांनी त्यांच्यावर कारवाई केली होती.

ईडीकडूनही रवी अग्रवाल यांची चौकशी करण्यात येत असल्याची माहिती पुढे आलेली आहे. आहे. इजराईल सेठ यांचा जरीपटका येथे जिंजर मॉल चर्चेत आहे. कारवाई आणखी दोन ते तीन दिवस चालणार असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. प्राप्तिकर विभागाच्या या कारवाईने व्यावसायिकांचे धावे दणाणले आहे. जप्त केलेल्या कागदपत्रांमुळे आणखी काय माहिती समोर येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हार्ड डिस्कसह रोख रक्कमही ताब्यात

  • सर्वच व्यापाऱ्यांकडून संशयित व्यवहाराची कागदपत्रे, हार्ड डिस्कसह रोख रक्कमही ताब्यात घेतल्याची माहिती आहे. दरम्यान, काही ठिकाणचे छापे रात्री बंद करण्यात आले असून निवासस्थान, कार्यालयातील कारवाई सुरूच होती.

  • ईडीने दिलेल्या माहितीच्या आधारे स्थानिक प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांना न कळवता संबधितांची माहिती काढण्यात आली. त्यानुसार संपूर्ण व्यूहरचना आखण्यात आली. मुंबईवरून चमू निघाल्यानंतरही कोणलाही कुठे जात आहे याबद्दल सांगण्यात आले नाही.

  • चमू वाहनांत बसल्यानंतर त्यांच्याकडील मोबाईलही ताब्यात घेण्यात आल्याचे बोलले जात आहे. कारवाईबाबत अतिशय गुप्तता पाळल्याने स्थानिक अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

  • यापूर्वी रम्मु अग्रवाल यांच्या निवासस्थानांसह शहरात सक्रिय सडक्या सुपारीच्या व्यापाऱ्यांसही प्राप्तिकर विभागाचे छापे टाकण्यात आले होते. याशिवाय आता मिरची व्यापारी, काही बिल्डरांवर प्राप्तिकर विभागाची कारवाई होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICAI CA Final Result 2025 : आयसीएआय सीएचा परीक्षेचा निकाल जाहीर, जाणून घ्या कुठे आणि कसा पाहू शकता?

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

ठरलं! 'चला हवा येऊ द्या' या दिवशी सुरु होणार... विनोदाच्या गँगवारमधून यंदा भाऊ कदम गायब?

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Ashadhi Ekadashi 2025 : देवशयनी आषाढी एकादशी; विठ्ठल भक्तीचा महापर्व, एकात्मता भक्ती व समर्पणाचे प्रतीक

SCROLL FOR NEXT