नागपूर

ज्येष्ठ नागरिक उन्हात मात्र महापौरांचे तरुणाईसोबत सोहळे; पुन्हा लसीकरण बंद

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : लसीकरणासाठी महापालिकेने (Vaccination in Nagpur NMC) ज्येष्ठ नागरिकांना झुलविणे सुरू केले आहे. दररोज ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणाबाबत निर्णय बदलत आहे. आज ४५ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण (45 plus Vaccination) झाले. आज त्यांचे लसीकरण बंद राहणार असल्याचे महापालिकेने कळविले आहे. दरम्यान, १८ वर्षावरील तरुणाईच्या लसीकरण केंद्राच्या उद्घाटन सोहळ्यात रमलेले महापौर दयाशंकर तिवारी (Mayor Dayashankar Tiwari) यांना ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणाकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. (Inconvenience to 45 plus people for taking vaccine in Nagpur)

शहरातील केंद्रावर रविवारी ४५ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण पार पडले. लसीकरणाबाबत काही भरवसा नसल्याने सकाळपासून ४५ वर्षावरील नागरिक रांगेत उभे दिसून आले. परंतु महापालिकेचे कर्मचारी अकरा वाजता केंद्रांवर पोहोचत असल्याने ज्येष्ठ नागरिकांना लसीकरणाचा क्रमांक येईस्तोवर चार ते पाच तास उन्हात उभे राहावे लागत आहे. नरेंद्रनगर येथील गजानन महाराज मंदिर परिसरात ६० वर्षावरील एका वृद्धाला तीन तास उभे राहावे लागले. ज्येष्ठ नागरिक लसीकरणाच्या प्रतीक्षेत उन्हात घाम गाळत आहे. अशा स्थितीत त्यांना काही झाल्यास जबाबदार कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

लसीकरणासाठी ज्येष्ठांचा कस लागत असताना महापौर दयाशंकर तिवारी १८ वर्षावरील तरुणाईच्या लसीकरण केंद्राच्या उद्धाटन सोहळ्यात रमले आहेत. मनीषनगर येथील जय हिंद सोसायटीतील विरंगुळा केंद्रात महापौरांच्या उपस्थितीत १८ ते ४५ वर्ष वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू झाले. एवढेच नव्हे राजकुमार गुप्ता समाज भवन येथेही महापौरांच्या उपस्थितीत लसीकरण सुरू झाले.

१८ ते ४५ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणासाठी प्रत्यक्ष उपस्थित राहणाऱ्या महापौरांना ज्येष्ठ नागरिकांची तडफड दिसत नाही काय? असा सवाल केला जात आहे. दरम्यान, शहरातील ४५ वर्षावरील नागरिकांचे सोमवारी लसीकरण होणार नसल्याचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी सांगितले. गेल्या काही दिवसात ४५ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण दिवसाआड होत आहे. त्याचवेळी १८ ते ४४ वर्षे वयोगटातील व्यक्तीसाठी सोमवारी ६० केंद्र सुरू राहतील.

(Inconvenience to 45 plus people for taking vaccine in Nagpur)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana October Installment : लाडक्या बहिणींचा ऑक्टोबरचा 1500 रुपयांचा हप्ता 'या' तारखेला होणार जमा? समोर आली महत्त्वाची अपडेट, सरकारकडून अधिकृत घोषणा कधी?

IND vs NZ 2nd ODI Live : भारताच्या माऱ्यासमोर न्यूझीलंडची दैना! आकिब नबी, गुरनूर ब्रार चमकले; शुभमन गिलची चूक मात्र महागात पडली

अवघ्या २ कोटींचं बजेट, जगभरात ४५० कोटींची कमाई; 'हनुमान अंश' आता ओटीटीवर होणार रिलीज, कुठे पाहता येणार?

Latest Marathi News Live Update: अभिनेते सयाजी शिंदे कर्जतमध्ये दाखल

Mumbai Local: दिवाळीत मध्य रेल्वेच्या मेगाब्लॉकचा अडथळा! लक्ष्मीपूजन, नरक चतुर्दशीलाच ब्लॉक; पश्चिम रेल्वेचा प्रवाशांना दिलासा

SCROLL FOR NEXT