Increased RTPCR tests in chandrapur district said central health team  
नागपूर

चंद्रपूर जिल्ह्यात आरटीपीसीआर तपासण्या वाढवा; केंद्रीय आरोग्य पथकाचे निर्देश

सकाळ डिजिटल टीम

चंद्रपूर ः कोरोना विषाणूचा प्रसार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस बाधित रुग्णांची संख्यादेखील वाढत आहे हा प्रसार रोखण्यासाठी जिल्ह्यात आरटीपीसीआर तपासण्या मोठ्या प्रमाणात वाढवाव्यात, अशा सूचना केंद्रीय आरोग्य पथकाने जिल्हा प्रशासनाला दिल्या.

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील प्रशासनाच्या कोरोना नियोजनाची पाहणी व केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक चंद्रपुरात दाखल झाले. दोन सदस्यीय पथकात एम्स,जोधपूरचे डॉ.निशांत चव्हाण यांच्यासह दिल्ली एनसीडीचे उपसंचालक डॉ. जयकरण यांचा समावेश आहे. 

जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आलेल्या कोरोना विषयक उपाययोजनांची केंद्रीय पथकाने प्रशंसा केली. आरटीपीसीआर चाचण्या वाढविण्यासाठी मायक्रोबायोलॉजीस्ट व मनुष्यबळ वाढविण्याच्या सूचना देतानाच कॉन्ट्रॅक्‍ट ट्रेसिंग मोठ्या प्रमाणात वाढविण्यासही सांगितले. ऑक्‍सिजनच्या कमतरतेमुळे रुग्णांचा मृत्यू होतो. त्यासाठी शरीरातील ऑक्‍सिजनची पातळी तपासणीसाठी पल्स ऑक्‍सीमिटर वाटपाचे निर्देशही केंद्रीय पथकाने दिलेत. यावेळी केंद्रीय आरोग्य पथकाकडून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील लसीकरण केंद्राची पाहणी करण्यात आली. 

जिल्ह्यातील लसीकरण मोहिमेची माहिती त्यांनी जाणून घेतली. जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात पार पडलेल्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी कोरोना संसर्गाची संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हा प्रशासन कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सर्तकतेने उपाययोजना राबवत असल्याची माहिती दिली. तसेच आरटीपीसीआर चाचण्यांही जिल्ह्यात सुरू असून रुग्णांचे वेळेत निदान होण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. 

जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात खाटांची व इतर अत्यावश्‍यक सुविधांची उपलब्धता ठेवण्यावर प्रामुख्यान भर देण्यात येत असल्याचे सांगितले. या बैठकीला अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, डॉ. अरुण हुमने, जिल्हा सर्वेक्षण अधिकारी डॉ. सुधीर मेश्राम, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश साठे, डॉ. खंडाळे यांची उपस्थिती होती. 

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News: मराठी डिजिटल न्यूजमध्ये eSakal पुन्हा नंबर 1; Comscoreच्या ताज्या आकडेवारीत 7.4 कोटींचा टप्पा

Chandgad MD Drugs Case: चंदगड पोलिस, पालकांची जबाबदारी वाढली; हाजगोळी ड्रग्ज प्रकरण; मुलांच्या वर्तणुकीकडे लक्ष ठेवण्याची गरज

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Latest Marathi News Live Update : जसप्रीत बुमराहला मागे टाकत मिचेल स्टार्क कसोटी क्रमवारीत अव्वल

Sparrow Chick Rescue : घरट्यातून पिल्लू खाली पडलं अन्...; चिमणीची लेकरासाठी जीवाचा आकांत करणारी धडपड पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, हॉस्पिटलबाहेरील 'तो' प्रसंग नक्की काय?

SCROLL FOR NEXT