Devendra Fadnavis Sakal
नागपूर

Independence Day : गरिबांना घर, शेतकऱ्यांच्या योजना अन्...; नागपुरात फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ध्वजारोहण केले. यावेळी त्यांनी राज्याच्या विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचं सांगितलं आहे. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सर्वसमान्यांना दिलासा मिळत असून राज्याचा विकास चांगल्या पद्धतीने सुरू असल्याचं ते म्हणाले.

"प्रत्येक शेतकऱ्यांना एक रूपयामध्ये आपल्या सरकारने विमा दिला आणि अनेक शेतकऱ्यांनी या विम्याला प्रतिसाद दिला. महाराष्ट्रातील दीड कोटी शेतकऱ्यांनी यामध्ये सहभाग घेतला. सध्या पावसाचे प्रमाण कमी आहे पण मला अशी आशा आहे की पाऊस अजून येईल. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील असतो." असं ते म्हणाले.

शेतकऱ्यांना ज्या गोष्टी लागतात त्या आम्ही देतो, मागेल त्याला शेततळे, मागेल त्याला पेरणी यंत्र आणि अशा अनेक गोष्टी आम्ही मागेल त्या शेतकऱ्यांना देत आहोत. त्याचबरोबर नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेंतर्गतसुद्धा शेतकऱ्यांना फायदा होत आहे. या योजनेंचा लाभ सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहचून त्यांच्यामध्ये समृद्धी येईल.

शेतमालावर प्रक्रिया झाली पाहिजे, त्याला भाव मिळाला पाहिजे, त्याचबरोबर शेती व्यवसाय वाढीकडे सुद्धा आमचं लक्ष असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

पंतप्रधान आवास योजनेमार्फत आणि मोदी आवास योजनेमार्फत भटके, आदिवासी, ओबीसी समाजातील नागरिकांना घर देण्यात येणार आहे.गरिबांना घर देण्याची संधी यावर्षी आपल्याला मिळाली आहे. प्रत्येक गरिबांच्या डोक्यावर छत असेल तेव्हाच त्याला स्वातंत्र्याचा खरा अर्थ कळेल. पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री शिंदेंच्या नेतृत्वामध्ये हे काम चांगल्या पद्धतीने होईल असं म्हणत त्यांनी नागरिकांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPF Rule: नोकरी बदलली तर 5 वर्षांचा PF नियम तुटतो का? NCP Days म्हणजे काय? पेन्शन-टॅक्सवर काय परिणाम

Summer Heatwave : उन्हाच्या तडाख्याने कळपावर संकट; २८ मेंढ्यांचा मृत्यू, ७० मेंढ्यांवर उपचार सुरू

Mumbai Goa Highway Update : गडकरी म्हणाले महिनाभर, पण वास्तव काही वेगळंच! मुंबई-गोवा महामार्गाची पाहा सविस्तर 'डेडलाईन'; पावसाळ्यापूर्वी रस्ता होणार का चकाचक?

Electricity Bill Saving Tips : सरकारने स्वतःच सांगितली लाईट बिल कमी करण्याची पद्धत; मीटर पळेल एकदम हळू, पाहा सोपी ट्रिक

Asha Bhosle’s Final Song : “या प्रवासाच्या शेवटी मी एक स्वर बनेन…” आशा ताईंंच शेवटचं गाणं चर्चेत, Viral Video

SCROLL FOR NEXT