Indian Defense Force Sakal
नागपूर

Indian Defense Force : भारतीय संरक्षण दलात महिला राज ; एकूण ९ हजार ५८१ महिला सेवेत; नियम लिंगभेद विरहित

यापैकी नर्सिंग सेवेत सर्वाधिक ३ हजार ८४१ महिला आहेत.

केतन पळसकर : सकाळ वृत्तसेवा

नागपूर - संरक्षण मंत्रालयातर्फे नुकत्याच प्रसिद्ध करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार लष्कर, वायूदल, नौदल आणि सशस्त्र दल वैद्यकीय सेवेत महिला राज असल्याचे अधोरेखित झाले आहे. आज हा आकडा ९ हजार ५८१ पर्यंत पोहोचला आहे.

यापैकी नर्सिंग सेवेत सर्वाधिक ३ हजार ८४१ महिला आहेत. तर, त्या पाठोपाठ लष्करात १ हजार ७३३, वायूदल १ हजार ६५४, वैद्यकीय तुकडी १ हजार २१२ महिलांचा क्रमांक लागतो. सशस्त्र दलांमध्ये, कोणत्याही दलात अथवा सेवांमध्ये पुरुष-महिला अधिकाऱ्यांच्या कामकाजात भेदभाव केला जात नाही, असे संरक्षण मंत्रालयातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

सैन्याच्या आवश्यकतेनुसार या महिला अधिकाऱ्यांना नियुक्त करण्यात येते. प्रशिक्षण, पोस्टिंग, पदोन्नती, प्रतिबद्धतेच्या अटी इत्यादी महिला आणि पुरुष दोघांसाठी समान आहेत.

भारतीय सशस्त्र दलातील रोजगारासंबंधीचे नियम लिंगभेद विरहित असून स्त्री आणि पुरुषांना समान संधी दिली जाते, असेही यामध्ये नमूद करण्यात आले. त्यामुळे, तिन्ही दलासह वैद्यकीय आणि प्रशासन अशा प्रत्येक विभागांत महिला हिमतीने काम करीत असून महिलांसाठी ही अभिमानाची बाब आहे.

सशस्त्र दल वैद्यकीय सेवा (एएफएमएस)
स्‍थलसेना, वायूदल, नौदल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विदर्भात मॉन्सून पुन्हा सक्रीय; 'या' पाच जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट, मुसळधार पावसाची शक्यता

Iran Politics: इराणच्या सत्तेत मोठी खळबळ! खामेनेईंविरोधात घरातूनच बंड? नातलगाने मांडला 'नवीन सरकार'चा आराखडा

Marathi News Live Updates : जालन्यात महाविद्यालयाचा स्लॅब कोसळला, एका मजुराचा मृत्यू

NEET paper leak: 'नीट'च्या प्रश्नपत्रिका NTAच्या तज्ज्ञांनीच फोडल्याचा सीबीआयचा निष्कर्ष? 'सप्लाय चेन'बाबत तपासात धक्कादायक माहिती

Nagpur Crime : निर्भयच्या घरात आढळला सुऱ्या, चॉपर, लॅपटॉप अन् गर्भनिरोधकांचा साठा

SCROLL FOR NEXT