Nagpur railway station sakal
नागपूर

Indian Railway : CSMT पुर्नविकासांतर आता नागपूर रेल्वे स्थानक जागतिक दर्जाचे बनणार... इतक्या कोटीचा खर्च

स्थानकाच्या पुर्नविकासाठी ४८७.७७ कोटीचा खर्च

सकाळ वृत्तसेवा


मुंबई :  सीएसएमटीच्या पुर्नविकासांतर आता राज्यातील नागपूर रेल्वे स्थानकाचाही पुनर्विकास करण्यात येत आहे. स्थानकाचा पुर्नविकासाठी एकूण ४८७.७७ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.  

आधीच उभारलेल्या हेरिटेज वास्तूचे स्वरूप कायम ठेवून स्थानकाच्या पुनर्विकासाचे करण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे. भारतीय रेल्वे आधुनिकीकरणाकडे वेगाने वाटचाल करत आहे, ज्या अंतर्गत रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास आणि अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज करण्यात येत आहे.

त्याच क्रमाने महाराष्ट्रातील नागपूर रेल्वे स्थानकाचाही पुनर्विकास करण्यात येत आहे. नागपूर रेल्वे स्थानकाचा एकूण  ४८७.७७  कोटी रुपये खर्चून पुनर्विकास करण्यात येणार आहे. या पुनर्विकसित स्टेशन सर्व अत्याधुनिक प्रवासी सुविधांनी सुसज्ज असेल.  

यात एक मोठा रूफटॉप प्लाझा, प्रवाशांच्या सोयीसाठी २८ लिफ्ट आणि ३१ एस्केलेटरची व्यवस्था असेल आणि प्रवाशांच्या सुरळीत हालचाल करण्यासाठी स्वतंत्र आगमन आणि निर्गमन व्यवस्था असेल.

याशिवाय बेसमेंट पार्किंग, वेटिंग एरिया, सीसीटीव्हीची सुविधा तसेच संपूर्ण स्टेशन अपंगांसाठी अनुकूल करण्यात येणार आहे.  

रेल्वे स्थानक ते मेट्रो स्थानक, शहर बस आणि वाहतुकीच्या इतर साधनांपर्यंत कनेक्टिव्हिटी विकसित केली जाईल.  पुनर्विकसित स्टेशनची रचना ग्रीन बिल्डिंग म्हणून केली जाईल आणि त्यात सौर ऊर्जा, जलसंधारण आणि पावसाचे पाणी साठवण्याची सुविधा असेल.

 सध्या, बॅचिंग प्लांटची स्थापना, साइट लॅबचे बांधकाम, विद्यमान दुधाचे साइडिंग प्रस्तावित नवीन ठिकाणी स्थलांतरित करणे आणि वजन पूल कार्यान्वित करणे ही कामे पूर्ण झाली आहेत. नागपूर रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासामुळे प्रवाशांना केवळ जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध होणार नाहीत, तर स्थानक परिसराच्या सामाजिक-आर्थिक विकासाला चालना देण्यातही ते महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT