नागपूर

नागपूरमधून दारूगोळ्याची रसद; पहिली खेप लष्कराकडे

राजेश चरपे

नागपूर : नागपूरच्या ‘इकॉनॉमिक एक्सप्लोझिव्ह लिमिटेड’ या खासगी कंपनीने तयार केलेल्या पूर्णपणे स्वदेशी बनावटीच्या हातबॉम्बची पहिली खेप संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत भारतीय लष्कराकडे सोपवण्यात आली. संरक्षण सामग्री उत्पादन क्षेत्रातील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. ‘आत्मनिर्भर भारत’च्या दिशेने एक मोठे पाऊल असल्याचे संरक्षण मंत्री म्हणाले.

दोन वर्षांत संरक्षणविषयक निर्यातीने १७ हजार कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. भारतात खासगी उद्योगाने प्रथमच संरक्षण दलासाठी दारूगोळा तयार केला आहे. ‘सोलर इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड’ची मालकीची उपकंपनी ‘इकॉनॉमिक्स एक्सप्लोझिव्ह लिमिटेड’ या (ईईएल) कंपनीने मागील महिन्यापासून सशस्त्र दलांना आधुनिक हँडग्रेनेड पुरवायला सुरुवात केली आहे.

यावेळी ईईएलचे अध्यक्ष एस. एन नुवाल, लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे, डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. जी. सतीश रेड्डी, इन्फन्ट्रीचे अध्यक्ष व महासंचालक लेफ्टनंट जनरल ए. के. सामंत्र उपस्थित होते. लवकरच भारत केवळ देशांतर्गत वापरासाठीच नव्हे तर जगासाठी संरक्षण उत्पादनांची निर्मिती करेल. हे नवीन ग्रेनेड्स आतापर्यंत सेवेत असलेल्या पहिल्या महायुद्धाच्या विंटेज डिझाइनच्या ग्रेनेड क्रमांक ३६ ची जागा घेतील, असे राजनाथसिंह म्हणाले.

उच्च दर्जाची गुणवत्ता

नागपूरमध्ये तयार झालेले हँडग्रेनेड्‍स उच्च दर्जाचे आहेत. सर्वच ऋतूत आणि प्रदेशात त्याची उपयोगिता आहे. पायदळ आणि डीजीक्यूएद्वारे सर्व मापदंडांवर मैदानी प्रदेश, वाळवंट आणि मोठ्या उंचीवरील प्रदेशात उत्पादनांची चाचणी घेण्यात आली आहे. या हँडग्रेनेड्‍सनी ९९.८ टक्के गुणवत्ता सिद्ध केल्याचे राजनाथसिंग यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhoom News : धाराशिवच्या लेकीची राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण भरारी! हिवरड्याच्या पार्थसारथी मुंडेचे दिल्लीतील राष्ट्रीय लॉन टेनिस स्पर्धेत अजिंक्यपद

Akola Crime : अकोल्यातील दोन प्रसिद्ध डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल; रुग्णाच्या मृत्यूप्रकरणी न्यायालयाचे आदेश

Velhe News : शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण! निगडे बुद्रुक येथे शेतात १५ किलो पेक्षा अधिक वजनाचा बर्फाचा गोळा आकाशातून कोसळला; सुदैवाने शेतकरी बचावले

BJP National President Attack : 'देशात अस्थिरता निर्माण करण्याच्यामागे परकीय शक्तींचा हात'; 'इंडिया' आघाडी आणि केजरीवालांवर भाजपचा घणाघात

Karmad Accident : मशाल ज्योत घेऊन जाणाऱ्या भाविकांना आयशरची धडक; तिघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT