attendant demanded money while handing over the baby to relatives sakal
नागपूर

Nagpur : पेढा-बर्फी नको, हातावर नोटेचा प्रसाद ठेवा

मेयोतील प्रकार; प्रशासनाची प्रतिमा मलिन; चौकशी होणार; तक्रारीची घेतली जाणार दखल

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : घरात नवीन पाहुणा येणार म्हणून सारे कुटुंब आनंदी असते. अशातच बाळ जन्माला आल्याची ‘वार्ता’ सांगण्यासाठी मावशी रुग्णालयाच्या नातेवाइकांसमोर येते. घरात मुला-मुलींच्या रूपाने नवा पाहुणा आल्यामुळे रुग्णांचे नातेवाईकही आनंदाने पेढा किंवा बर्फी मावशीच्या हातावर ठेवतात.

मात्र, अलीकडे पेढा-बर्फी नको, पिवळ्या नोटेसहीत निळ्या नोटेचा हातावर प्रसाद ठेवा, असे नातेवाईकांच्या कानात गाणे गुणगुणल्यासारखे सांगण्यात येते. जबरदस्तीने भेट घेण्यात येत असल्याची माहितीही पुढे आली आहे.

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) हे चित्र दर दिवसाला अनुभवायला मिळते. मेयोतील लेबर रुममध्ये नुकताच हा प्रकार उघडकीस आला आहे. बाळ जन्माला आल्यानंतर बाळ आणि आईला वॉर्डात हलवण्यात येते. यावेळी मायलेकाला हलवताना बाळाची मुंह दिखाई म्हणून अटेंडंट किंवा सफाईगाराच्या हातवर पूर्वी आनंदाच्या भरात पेढा बर्फी ठेवला जात होता.

येथे नातेवाईक पेढ्यांचा पॉकिटही आणून देत होते. परंतु, अलिकडे लाडू, जिलबी किंवा पेढा, बर्फी आणण्याच्या नातेवाइकांच्या या परंपरेला खीळ बसली आहे. आता मुलगा किंवा मुलगी झाली की, पेढा-बर्फी नको, एक पिवळी आणि एक निळी नोट द्या, अशी थेट मागणी करणारे कर्मचारी'' मेयोत दिसतात.

घरात मुला-मुलींच्या रूपाने नवा पाहुणा आल्यामुळे रुग्णांचे नातेवाईकही आनंदाने पाच-पन्नास नव्हे तर शंभर रुपये अटेंडंटच्या हातावर ठेवतात. परंतु, यात वाढ झाली, ही एकप्रकारे चिरीमिरी असल्याची भावना एका नातेवाइकाने सकाळ प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केली. तशी तक्रारही एका व्यक्तीने वॉर्डात केली आहे. ही छुप्या पद्धतीने घेतली जात असलेली भेट एकप्रकारे चिरीमिरी असल्यामुळे मेयोतील प्रशासनाची प्रतिमा मलिन होत असल्याचा होत आहे.

दररोज २५ बाळ येतात जन्माला

मेयोमध्ये दर दिवसाला सुमारे २० ते २५ बाळांचा जन्म होतो. एका बाळाच्या नातेवाइकांकडून दोनशे रुपये घेतल्यास २४ तासांमध्ये ४ ते ५ हजार रुपयांची चिरीमिरी घेतली जात असल्याचे गणितही या नातेवाइकाने मांडले. अलीकडे एका निळ्या नोटेने भागात नाही तर सोबतीला पिवळी नोट द्या, अशीही मागणी होते,

कधी-कधी तर जबरस्ती करण्यात येत असल्याचे सांगण्यात येते. विशेष असे की, लेबर वार्डात ड्युटी लावून घेण्यासाठी अर्थकारण गुंतले असल्याची जोरदार चर्चा येथे आहे. यासंदर्भात मेडिकलचे वैद्यकीय अधीक्षक यांच्याशी संपर्क साधला असता, यासंदर्भात चौकशी करण्यात येईल, असे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लावणीची लय, अभिनयाची जादू अन् अजरामर भूमिका; मधू कांबीकर यांची एक्झिट, मराठी कलाविश्वावर शोककळा

VIRAT KOHLI : विराट कोहलीच्या टेस्ट निवृत्तीला अजित आगरकर जबाबदार? ‘ज्या पद्धतीने त्याच्याशी वागलं...’ माजी क्रिकेटपटूचं मोठं वक्तव्य

Kolhapur Ambabai Temple : नवरात्रोत्सवाच्या धामधुमीत कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात नवा वाद; देवस्थान समितीविरोधात पुजारी आक्रमक; नेमका वाद काय?

SA vs AUS 1st Test: व्हॉट अ कॅच...! स्टीव्ह स्मिथची चतुराई अन् आफ्रिकन फलंदाजचा करेक्ट कार्यक्रम; ऑसी खेळाडूचा विश्वविक्रम Video

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर कारखाना निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचे खाते उघडले; संग्राम सोरटे विजयी

SCROLL FOR NEXT