Information on why women do not break coconut 
नागपूर

महिला नारळ का फोडत नाही? तुम्हाला माहित आहे का?

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : हिंदू धर्मामध्ये कोणत्याही देवाची पूजा करण्याआधी श्रीगणेशाची पूजा केली जाते. भगवान गणेशाची पूजा केल्याशिवाय पूजा पूर्ण होत नाही. यामागे मोठे कारण आहे. तसेच पूजा करताना नारळाला (श्रीफळ) मोठे महत्त्व आहे. पूजा करताना नारळ असणे गरजेचे असते. नारळाशिवाय पूजा अपूर्ण मानली जाते. असे म्हणतत की नारळ चढवल्याने पैशांची समस्या व धन संपत्ती बद्दल समस्या दूर होतात. पुजेनंतर हेच नारळ फोडून सर्वांना प्रसाद म्हणून दिला जातो. मात्र, हे नारळ स्त्री कधीच फोळत नाही. मात्र, स्त्री नारळ का फोडत नाही, हे अनेकांना माहिती नाही. चला तर जाणून घेऊन या मागील कारण... 

एखादी महिला मंदिरात किंवा मंदिराच्या बाहेर पूजा करीत असताना इकडे-तिकडे पाहत असते. अशावेळी लाहन मुलगा, युवक किंवा पुरुष जाताना दिसला तर ती त्याला नारळ फोडून देण्याची विनंती करते. तो व्यक्‍तीही मुक्‍याट्याने तिची मदत करीत नारळ फोडून देतो. मला का नारळ फोडून मागत आहात असा प्रतिप्रश्‍न कुणीही करीत नाही. मात्र, ज्यांना यामागचे कारण माहित नसते तो, महिला नारळ का फोडत नाही याचा विचार करीत असतो. 

आपण कोणत्याही मंदिरात गेलो की अनेक पुरुष नारळ फोडताना दिसून येतात. तसेच मोठ्या मंदिरांमध्ये काही पुरुषांसाठी निव्वळ नारळ फोडण्यासाठी नियुक्‍ती केलेली असते. महिला किंवा मुली तुम्हाला कधीही नारळ फोडतांना दिसणार नाही. तसेच बऱ्याचदा आपल्या दिसून येते की मंदिराचे पंडितच नारळ फोडण्याचे काम करतात. मात्र, स्त्रिया नारळ फोडताना कधीही दिसत नाहीत. 

प्रजनन क्षमतेशी जुळलेले

महिला नारळ फोडत नाही, त्यामागील एक प्रमख कारण म्हणजे नारळ हे बीजरूपी असल्यामुळे प्रजनन क्षमतेशी जुळलेले आहे. महिला बीजरूपातच बाळाला जन्म घालतात. अगदी त्याच्याशी नारळाचा संबंध आहे. म्हणूनच हिंदू धर्म शास्त्रानुसार स्त्रियांना नारळ फोडण्याचा अधिकार दिलेला नाही. किंबहुना स्त्रियांनी नारळ फोडणे हे हिंदू शास्त्रांमध्ये अशुभ मानले जाते. 

नारळाला मानतात मानवाच प्रतिरूप!

शास्त्रानुसार स्त्रियांनी नारळ फोडणे हे अशुभ मानले जाते. यामागे एक कथा ही अशी प्रचलित आहे की, जे ब्रह्मऋषी विश्‍वमित्र होते त्यांनी या विश्‍वाची निर्मिती केली. मात्र, हे विश्‍व निर्माण करण्यापूर्वीच ब्रह्मऋषी विश्‍वमित्र यांनी नारळाची निर्मिती केली होती. म्हणूनच या नारळाला मानवाचे प्रतिरूप मानले जाते. 

(बातमीतला काही भाग सोशल मीडियावरून साभार) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi : वैभवसाठी संजू सॅमसनला बळीचा बकरा का बनवताय? माजी खेळाडूचा संतापजनक सवाल...

ऑफिसमध्ये एकाला थंडी तर दुसऱ्याला घाम का येतो? वाचा सेंट्रल एसीच्या या परिस्थितीमागचं खरं कारण

Ladki Bahin Yojana Update : लाडक्या बहिणींनो लक्ष द्या! तुमच्या बँक खात्यात 1500 ऐवजी जमा होणार 3,000 रुपये? पण 'या' 80 लाख महिलांना बसू शकतो फटका!

आगीत काय जळालं ते राखेलाच माहीत! ‘बोल बोल राणी’च्या ट्रेलरवर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट, चित्रपटात सईच्या तीन भूमिका?

Latest Marathi News Live Update : सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या भीमाशंकर पट्ट्यात अजूनही मुसळधार पावसाची प्रतीक्षा कायम

SCROLL FOR NEXT