Taj-Mahal
Taj-Mahal 
नागपूर

शुद्ध संगमरवरी असलेले जगातील सातवे आश्‍चर्य धोक्यात, हे आहे कारण

राघवेंद्र टोकेकर

राघवेंद्र टोकेकर
नागपूर : "बादशहाच्या अमर प्रीतीचे मंदिर एक विशाल, यमुना काठी ताजमहाल' ज्येष्ठ संगीतकार स्वर्गीय सुधीर फडके यांची ही रचना कायमच ताजमहालाचे महत्त्व विषद करते. सातवे आश्‍चर्य म्हणून नावलौकिक असलेल्या ताजमहालाची नोंद शुद्ध संगमरवरी इमारत अशी करण्यात आली आहे. मात्र या शुद्ध संगमरवरी इमारतीला कीटकांचा धोका असून, हा धोका टाळण्यासाठी नागपुरातील नीरीचे संशोधक प्रयत्न करीत आहेत.

कायमच आपल्या सौंदर्याची मोहिनी घालणाऱ्या ताजमहालचे ऐश्‍वर्य अबाधित ठेवण्यासाठी अनेक संशोधन संस्था प्रयत्न करत आहेत. दिवसाला किती लोक ताजमहालाचे दर्शन घेऊ शकतील हे शोधण्याचा प्रयत्न करीत असलेल्या नीरी संशोधन संस्थेने ताजमहालाच्या संगमरवराचे आयुष्य धोक्‍यात असल्याचेच निदान केले. डोळ्यांनी न दिसणारे सुक्ष्म कीटक पांढऱ्याशुभ्र संगमरवर ठिसुळ करीत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. आग्रा येथील प्रदूषण व यमुनेचा घटलेला जलस्तर ताजमहालासाठी धोक्‍याचा असल्याचे स्पष्टीकरण अनेक पर्यावरणवाद्यांनी दिलेले आहे. दिव्यांच्या प्रकाशात फिरणारे किडे थंडगार संगमरवरावर प्रजनन करतात. त्यांचे आयुष्य काही तासांचेच असते. त्यामुळे संगमरवरावर किटकांचा थर साचतो. रासायनिक प्रक्रिया होते अन्‌ संगमरवर ठिसूळ होतो असे संशोधकांचे संशोधन आहे. नीरीच्या संशोधककांनी कीटकांचे नमुने नागपुरातील प्रयोगशाळेत आणले आहेत. विशेष म्हणजे हा धोका केवळ ताजमहालाचा नसून, भारतातील सर्वच पुरातन वास्तूंचा आहे. त्यामुळे या संशोधकांनी मुंबईतील सीएसटी रेल्वेस्थानकाचे, अजिंठा वेरुळ लेण्यांचे, सायन फोर्टचे व एलिफंटा केव्हचे देखील नमुन्यांचा अभ्यास सुरू आहे. देशातील ऐतिसासिक वारसा वाचविणारे रसायन तयार करण्याचा नीरीच्या संशोधकांचा प्रयत्न आहे.

पक्ष्यांच्या मुत्रामुळेही धोका?
कीटक कोणत्या ऋतुत प्रजनन करतात, ते कोणत्या दिशेने येतात या सगळ्या बाबीचा संशोधक अभ्यास करीत आहेत. शिवाय कीटकांचा थर बसणार नाही अशा रासायनिक प्रक्रियेविषयी सध्या नीरीमध्ये संशोधन सुरू आहे. असाच धोका पक्ष्यांच्या मुत्रामुळे होतो का ? याचेही प्रयोगशाळेत संशोधन सुरू आहे

पथदिव्यांचा अभ्यास
ताजमहाल परिसरात लावण्यात आलेले पथदिवे कोणत्या रंगाचे अथवा कोणत्या पद्धतीचे असावे याचा देखील संशोधक अभ्यास करीत आहेत. कारण दिव्यांभोवती फिरणारे कीडे आणि संगमरवरावर जमणाऱ्या कीटकांचे जवळचे संबंध असल्याची बाब संशोधनात उघड झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुराजचं शतक हुकलं; सीएसकेने ठेवलं 213 धावांच आव्हान

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT